अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच नाव मराठी मनोरंजन विश्वात कुणाला माहीत नाही असं कुणीही नसेल. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून अशी सिध्दार्थ चांदेकरची ओळख आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.सिध्दार्थ नेहिमी सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओ शेअर करतो.सध्या अभिनेत्याने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सिद्धार्थ चांदेकरने (siddharth chandekar) सोशल मीडियावर निरोगी राहण्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे याचे धडे शिकवत आहे. त्याने स्वत:चे वाढलेले वजन कसे कमी केले याबद्दल त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहितो, “माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. मला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण गेले.
सिध्दार्थ म्हणतो की, “सुरुवातीला म्हणजेच वर्षाच्या मी अजिबात माझ्या आरोग्याकडे लक्ष देत नव्हतो,
पण माझ्या फिटनेस ट्रेनर ने या मला खूप मदत केली आहे . माझं वजन 103 किलो होते ,आता मी 103 वरून मी जवळपास 16 किलो वजन कमी करत आता 87 किलोपर्यंत आणले आहे.
View this post on Instagram
एक चांगला माणूस होण्यासाठी, चांगले आयुष्य जगण्यासाठी शिस्त आणि प्रामाणिकपणा अतिशय आवश्यक आहे पण त्यासाठी आधी फिटनेस महत्वाच आहे.मला आता स्वतःकडे पाहून स्वतःच कौतुक वाटत आहे. माझा प्रवास संपलेला नसून तो नुकताच सुरु झाला आहे.”
मिताली मयेकर आणि सिध्दार्थ हे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. या गोड जोडीचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. सिध्दार्थ आणि मिताली आपल्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात.(marathi actor siddharth chandekar shared his weight loss journey through)