Saturday, June 29, 2024

‘मी तुला पतीपेक्षा जास्त खुश ठेवेन’, जेव्हा ‘या’ अभिनेत्रीकडे शर्लिन चोप्राने केली होती विचित्र मागणी

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या चित्रपटात जास्त दिसत नसल्या तरी माध्यमांत मात्र नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. अशाच अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते ते म्हणजे शर्लिन चोप्राचे (Sherlyn Chopra). अभिनेत्री शर्लिन चोप्राचा शुक्रवारी (११ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी…

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक विषयांवर आपले मत मांडताना ती दिसत असते. तिने जास्त चित्रपटात काम केले नसले, तरी ती कायम चर्चेत असते.

शर्लिनचा जन्म ११ फेब्रुवारी १९८४ मध्ये हैद्राबादमधये झाला होता. ‘बिग बॉस ३’ मुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तिने एकदा बोलताना सांगितले होते की, तिला अभिनेत्री विद्या बालनसोबत (Vidya Balan) रोमान्स करायची इच्छा आहे. यावेळी शर्लिन म्हणाली होती की, “मी विद्या बालनसोबत रोमँटिक सीन देऊ शकते. मला त्या खूप आवडतात. जर ती आत्ता ऐकत असेल, तर विद्या मी तुला पतीपेक्षा जास्त खूश ठेवू शकते.”

आपल्या विवादास्पद बोलण्याने कायम चर्चेत असणार्‍या शर्लिनने ‘बिग बॉस ३’च्या कार्यक्रमात बाथरूममध्ये कॅमेरा लावण्याची मागणी केली होती. यावेळी तिने कॅमेर्‍यासमोर अंघोळ करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही मागणी तर धुडकावून लावलीच, पण बिगबॉसच्या घरातूनही तिला लवकर बाहेर पडावे लागले होते. शर्लिन आणि वाद हे प्रकरण नेहमीच सुरू असलेले पाहायला मिळालेले आहे. २०१८मध्ये तिने चित्रपट निर्माता साजिद खानबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. यावेळी शर्लिनने सांगितले की, “मी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर साजिद खानला भेटायला गेले होते. त्यावेळी भेटी दरम्यान त्याने मला त्याच्या खासगी भागाला हात लावण्यास सांगितला होता. मात्र मी त्याला माझ्या भेटीचा उद्देश तो नाही म्हणत तिथून काढता पाय घेतला.”

शर्लिनने प्लेबॉय मासिकासाठी न्यूड सीन दिल्याने ती रातोरात चर्चेत आली होती. यावेळी तिने सिनेसृष्टीत मला काम मिळत नसल्याने मला असे करावे लागले, यासाठी तुम्हीच जबाबदार आहात असा चकित करणारा आरोप केला होता. तिने ‘कामसूत्र 3D’ आणि ‘दिल बोले हडिप्पा’ चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा