Friday, March 29, 2024

‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी

सध्या मनोरंजन क्षेत्रातला अत्यंत वाईट काळ सुरु आहे. लता मंगेशकर आणि रमेश देव या दोन दिग्गजांना मनोरंजनविश्वाने गमावले आहे. 2 फेब्रुवारी रोजी वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांच्या प्रभावी अभिनयाने स्वतःची मोठी ओळख निर्माण केली. रमेश देव यांनी त्यांचे संपूर्ण जीवन फक्त आणि फक्त चित्रपटांसाठी वाहून घेतले होते. रमेश देव यांनी जवळपास 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. खलनायकी भूमिकांमध्ये त्यांना सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. रमेश देव यांनी अचानक घेतलेली एक्सिट चटका लावून जाणारी होती. ते त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीपर्यंत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होते. अशा काही कार्यक्रमांचे त्यांचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.

रमेश देव यांनी त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी झी मराठीवरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणाऱ्या ‘हे तर काहीच नाय’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी सिद्धार्थ जाधव, अक्षया देवधर आधी कलाकारांसोबत खूपच धमाल केली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक मजेशीर किस्से सर्वांसोबत शेअर केले. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचा एक मजेशीर किस्सा देखील सर्वांना सांगितला. रमेश देव म्हणजे सळसळता उत्साहच होते, या मंचावर त्यांनी त्यांच्या ‘सूर तेच छेडीता’ या गाण्यावर ठेका देखील ठरला. झी मराठीने या कार्यक्रमाच्या या खास भागाचा एक प्रोमो त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रमेश देव यांच्या चेहऱ्यावर कुठलाही क्षीण किंवा कुठलाही त्रास नव्हता.

या ‘हे तर काहीच नाय’ शोच्या खास भागात रमेश देव यांना शेवटचे अनुभवायची संधी सर्वांना मिळणार आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आणि अनुभव यावेळी शेअर केले. 1951 साली रमेश देव यांनी ‘पाटलाची पोर’ या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या 1962 साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या बॉलिवूडमधील ‘आनंद’ या सिनेमातील डॉ कुलकर्णी ही भूमिका तुफान गाजली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश
‘मी एक सुरक्षित व्यक्ती असून मला माझ्या पत्नीवर…’ अभिषेक बच्चनने सांगितले पतिपत्नीच्या सुखी नात्याचे रहस्य

 

हे देखील वाचा