Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड शिल्पाने शेअर केला जॅकलिनसोबतचा डान्स व्हिडिओ, मूव्ह्ज पाहून चाहते म्हणाले ‘मस्ती ओव्हरलोड’

शिल्पाने शेअर केला जॅकलिनसोबतचा डान्स व्हिडिओ, मूव्ह्ज पाहून चाहते म्हणाले ‘मस्ती ओव्हरलोड’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मग ती तिच्या सौंदर्याबद्दल असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. त्याचबरोबर शिल्पाला डान्सची किती आवड आहे हे सांगायची गरजच नाही. शिल्पा तिचे नवनवीन डान्स व्हिडिओ शेअर करून सोशल मिडियावर चर्चेत असते. तिच्या प्रत्येक डान्स मुव्ह्जने चाहत्यांचे मने जिंकत असते. नुकताच शिल्पाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि जॅकलिन डान्स करताना दिसत आहेत. दोघेही पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये आहेत.

शिल्पाने (Shilpa Shetty) गुलाबी रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्ससह काळ्या रंगाचा सँडल घातला आहे. तर जॅकलिन ( Jacqueline Fernandez) स्काय ब्लू स्वेटर आणि पांढऱ्या सँडलमध्ये दिसत आहे. शिल्पा शेट्टीने या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे की, “किडिंग अराउंड.” या व्हिडिओमध्ये चाहते दोघींच्या डान्स मूव्ह्जचा खूप आनंद लुटत आहेत.

हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, ज्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि जॅकलिनशिवाय रकुल प्रीत देखील सामील होती. जॅकलिन बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यासह, तिने थोडासा मेकअप केला आहे आणि बन स्टाईलने तिचे केस वर बांधले आहेत.

https://www.instagram.com/reel/CaXBqXIlLoe/?utm_source=ig_web_copy_link

राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांचे २००९ मध्ये झाले लग्न

शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. त्यानंतर ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अश्लील चित्रपट प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्राला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर करण्यात आले आहे.

जॅकलिनवर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप तर आहेच. पण जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, जॅकलिनने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हणत नाकारले आहे. पण अनेकदा जॅकलिन आणि सुकेशचे एकत्र आलेले फोटो त्यांच्या नात्याचे सत्य सांगतात.

अभिनेता अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात जॅकलिन दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कीर्ती सेननही आहे. त्याचबरोबर शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शब्बीर खानच्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. तर शिल्पा अलीकडे ‘हंगामा २’ मध्ये दिसली होती.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा