Saturday, January 28, 2023

सुकेश चंद्रशेखरसोबत वादग्रस्त नातं, तर सलमानशी जवळीक; जाणून घ्या जॅकलिन फर्नांडिसच्या अफेअर्सची यादी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernande) सध्या वादात सापडली आहे. ठग आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी जॅकलिनच्या जवळीकीने तिला मोठ्या संकटात टाकले आहे. त्यामुळे तिला ईडी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.

जॅकलिनवर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, तिने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हणत नाकारले आहे. पण जॅकलिन आणि सुकेशचे एकत्र आलेले फोटो त्यांच्या नात्याचे सत्य सांगतात.

जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक पोझ देताना दिसले. सुकेशचा जॅकलिनला किस करतानाचा फोटो पाहून तुम्हीही त्यांच्या जवळीकीचा अंदाज लावू शकता. जॅकलिनलाही ट्रोल केले जात आहे. तिची लव्ह लाईफ चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. चला तर मग अभिनेत्रीच्या अफेअर्सची यादी जाणून घेऊया.

शेख हसन बिन राशिद अल खलिफा
जॅकलिनच्या लव्ह लिस्टमध्ये बहरीनचा प्रिन्स टॉपवर आहे. शेख हसन बिन राशिद अल खलिफा आणि जॅकलिनचे बऱ्याच दिवसांपासून अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. जॅकलिनचे बहरीनच्या प्रिन्ससोबतचे अफेअर तिच्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात चर्चेत होते. तिने या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही.

साजिद खान
चित्रपट निर्माता साजिद खानसोबतही जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होती. दोघे नात्यात सिरियस असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अनेक वर्षे ते एकत्र होते. अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसले. साजिदच्या पझेसिव्ह स्वभावामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आले होते.

सलमान खान
जॅकलिनने सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. दोघेही एकमेकांचा सहवास एन्जॉय करतात. लॉकडाऊनमध्ये सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसमध्ये जॅकलिन सलमान आणि त्याच्या कुटुंबासोबत तिथेच राहिली. जॅकलिन आणि सलमानची जवळीक नेहमीच चर्चेत असते. मात्र दोघांनीही याबाबत कधीच उघडपणे बोलले नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा
जॅकलिनने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अ जेंटलमन’ या चित्रपटात काम केले होते. यादरम्यान दोघे डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी सिद्धार्थ अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आलियाला त्यांची जवळीक आवडली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.

जॅकलिनच्या अफेअर्सची यादी मोठी आहे. पण अभिनेत्री तिच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलली नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा