Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टी पारंपरिक वेशभूषेत झाली करवाचौथसाठी झाली तयार, परंतु पती राज कुंद्रा आहे तरी कुठे?

शिल्पा शेट्टी पारंपरिक वेशभूषेत झाली करवाचौथसाठी झाली तयार, परंतु पती राज कुंद्रा आहे तरी कुठे?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील तिचा पती राज कुंद्रासाठी करवाचौथचे व्रत केले आहे. शिल्पाने नुकतेच सोशल मीडियावर राज कुंद्राच्या आईने पाठवलेल्या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हॅप्पी करवाचौथ हे स्टिकर देखील लावले आहे. यासोबतच ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “माझ्या सासूने पाठवलेले गिफ्ट आहेत. सगळ्यांना करवाचौथच्या शुभेच्छा.”

शिल्पाने लाल आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तुम्हाला सगळ्यांना करावा चौथच्या शुभेच्छा. उपवास करणाऱ्या महिला, तुम्ही आणि तुमचे पती नेहमीच सुदृढ, सुरक्षित आणि खुश राहो.” या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शिल्पाच्या भांगेत सिंदूर आणि हातात चुडा दिसत असून, या साज-शृंगारात ती खूपच सुंदर दिसत आहे. शिल्पा दरवर्षी तिच्या पतीसोबत हे व्रत करत असते. परंतु आता असे दिसत आहे की, या वर्षी ती राज कुंद्राशिवाय हे व्रत करणार आहे. (Actress shilpa shetty kept karwa chauth fast for raj Kundra, share photos on social media)

करवाचौथचे व्रत महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुषासाठी करतात. विवाहित महिला सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत हे व्रत करतात. या दिवशी त्या निर्जळी उपवास करत असतात. मागच्या वर्षी शिल्पाने राज कुंद्रासोबत करवाचौथची पूजा करताना एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या गोष्टीचा खुलासा केला होता की, राज कुंद्रा देखील तिच्यासाठी हे व्रत करत असतो.

काही वेळापूर्वी शिल्पा शेट्टीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती गार्डनमधील एका पेरूच्या झाडाखाली उभी होती. ती या झाडावरील पेरू काढताना खूप खुश दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “पेरू पाहून शेतकरी काय विचार करत असतील?” शिल्पा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सातत्याने फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी जोडून राहत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा