Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड मानलं पाहिजे राव! पाय फ्रॅक्चर होऊनही शिल्पा गरबा काय सोडायची नाय, जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहाच

मानलं पाहिजे राव! पाय फ्रॅक्चर होऊनही शिल्पा गरबा काय सोडायची नाय, जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहाच

देशभरात सध्या नवरात्रीची धामधूम पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वजण हा सण साजरा करत आहे. अशात फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टी कशी काय मागे राहील? शिल्पाचा समावेश त्या कलाकारांमध्ये होतो, जे आपल्या घरात सणवार साजरे करतात. अशातच अभिनेत्री शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिल्पा पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच ती, ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिच्या नवरात्री स्पेशल ‘वसालड़ी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आश्चर्याची बाब अशी की, शिल्पाच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र, तरीही तिचा उत्साह कमी होत नाहीये. असे असले, तरीही अभिनेत्री एका जाग्यावर उभी राहून नॉनस्टॉप गरबा करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गुजराती होण्याचा हंगाम आहे. दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या माझ्या वर्तमानातील सर्वात आवडत्या गाण्यावर डान्स (एका पायावर असला तरीही).” या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 1 हजारांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस या व्हिडिओवर पडला आहे.

वर्कआऊट करते शिल्पा
वयाची चाळिशी ओलांडलेली अभिनेत्री शिल्पा आता 47 वर्षांची आहे. या वयातही शिल्पाचा फिटनेस कौतुकास्पद आहे. दुखापत होऊनही शिल्पा वर्कआऊट करण्यासाठी सुट्टी घेत नाही. ती दरदिवशी तिचे वर्कआऊट व्हिडिओ शेअर करते. कधी व्हील चेअरवर बसून खांद्याचा व्यायाम करते, तर कधी योगा करताना दिसते.

‘या’ सिनेमात झळकणार शिल्पा
शिल्पा शेट्टी हिच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती काही दिवसांपूर्वी ती तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग करत होती. यावेळी स्टंट करताना तिच्या पायाला दुखापत झाली. डॉक्टरांनी तिला कमीत कमी 6 आठवडे बेडवर विश्रांती करण्यास सांगितले आहे. ती ज्या सिनेमात दिसणार आहे, त्या सिनेमाचे नाव ‘इंडियन पुलिस फोर्स’ असे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! लेक पलकमुळे कंगाल झाली श्वेता तिवारी, व्हिडिओतून झाला खुलासा
नेहा कक्करशी वाद सुरू असतानाच फाल्गुनीसोबत नवरात्री साजरी करण्यासाठी पोहोचली रश्मिका, म्हणाली…

हे देखील वाचा