Sunday, April 14, 2024

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! लेक पलकमुळे कंगाल झाली श्वेता तिवारी, व्हिडिओतून झाला खुलासा

छोट्या पडद्यावरील दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रींमध्ये श्वेता तिवारी हिचाही समावेश होतो. श्वेताने आपल्या अभिनयावर मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चांगलीच चर्चेत असते. विशेष म्हणजे, ती तिची मुलगी पलक तिवारी हिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती सांगत आहे की, कशाप्रकारे तिला पैशांची कमतरता भासत आहे. या व्हिडिओत श्वेता तिची मुलगी पलकच्या खर्चांमुळे वैतागल्याचे दिसत आहे.

श्वेताकडे का नाहीयेत पैसे?
‘कसौटी जिंदगी की’मध्ये ‘प्रेरणा’ हे पात्र साकारून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने टीव्हीवर पुनरागमन केले आहे. ती ‘मैं हूं अपराजिता’ (Main Hoon Aparajita) या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. अशातच अभिनेत्रीने शोच्या सेटवरून एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती एका प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे. या रील पोस्टमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, तिच्याकडे पैसे का नाहीयेत. या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता तिचा कॅमेरा पलककडे फिरवते, जी मोबाईलवर व्यस्त होती. श्वेताचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडत आहे.

हेही वाचा- दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

श्वेताने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे.” पलकने या व्हिडिओवर लगेच कमेंट करत लिहिले की, “आई, कृपया खोटं बोलणं बंद कर.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

या व्हिडिओवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रती पांडे आणि विकास कलंत्री यांनी हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. दुसरीकडे, अर्जुन बिजलानी याने कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर एका चाहत्याने पलकची बाजू घेत लिहिले की, “ती कुठे पूर्ण दिवस मोबाईल वापरते. एवढं तर सर्वजण करतात.”

नेहमीच चर्चेत असतात मायलेकीची बाँडिंग
अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी यांच्यातील बाँडिंग त्यांच्या चाहत्यांना भलतेच आवडते. सोशल मीडियावरही या दोघांना पाहून चाहते त्यांना जुळ्या बहिणीही म्हणतात. श्वेताने पतीपासून वेगळे झाल्यानंतर एकटीने मुलांची पालनपोषण केले आहे.

हेही वाचा- दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नेहा कक्करशी वाद सुरू असतानाच फाल्गुनीसोबत नवरात्री साजरी करण्यासाठी पोहोचली रश्मिका, म्हणाली…
मोठी बातमी! 6 वर्षे नांदली अभिनेत्री अन् आता ‘या’ कारणामुळे दिला पतीला घटस्फोट

हे देखील वाचा