Saturday, July 6, 2024

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्रावर गंभीर आरोप झाले होते आणि त्यात त्याला अटकही झाली होती. मात्र, आता तो जामिनावर बाहेर आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टी वादांवर अनेकदा बोलणे टाळत असते आणि आपल्या कामात खूप व्यस्त असते. पण अलीकडेच जेव्हा तिला राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती मीडियावर प्रचंड चिडली.

राज कुंद्राशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत असे समोर आले की, तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. परंतु सोशल मीडियापासून विविध कार्यक्रमांपर्यंत शिल्पाला या प्रकरणाबद्दल विचारणा करण्याची एकही संधी मीडिया सोडत नाही. अलीकडेच जेव्हा शिल्पाला पुन्हा एकदा राज कुंद्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती प्रचंड भडकली. तिने प्रश्न विचारणाऱ्या लोकांची चांगलीच शाळा घेतली.

शिल्पा शेट्टी तिचा पती असणाऱ्या राज कुंद्राशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली की, “मी राज कुंद्रा आहे का? मी त्याच्यासारखी दिसते का? नाही नाही, मी कोण आहे? यानंतर, तिनेे पुढेे स्पष्ट केले की, एक सेलिब्रिटी म्हणून तक्रार करणे आणि स्पष्टीकरण न देणे हे तिला माहित आहे.

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिल्पाने एक अतिशय भावनिक मेसेज लिहिला. ज्यात ती म्हणाली होती की, “आपण सर्वांनी ऐकले आहे की, दुःख आपल्याला मजबूत बनवते आणि आपण आपल्या अडचणींमधून आपण शिकतो. हे खरे असू शकते, परंतु आपल्याला वाटते तितके हे सोपे नाही. कठीण काळ आपल्याला चांगले बनवत नाही. परंतु कठीण काळातून जाणे आपल्याला चांगले बनवते. मी इतरांइतकीच वाईट काळाचा तिरस्कार करते. पण मला माहित आहे की, मी त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी पुरेशी सामर्थ्यवान आहे.” शिल्पा शेट्टीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा