Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड ‘तुम्ही बदल घडवलात…’शिल्पा शेट्टीने PM मोदींनी लिहिले पत्र

‘तुम्ही बदल घडवलात…’शिल्पा शेट्टीने PM मोदींनी लिहिले पत्र

अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली अन् अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची चर्चा जगभर झाली. अजूनही या सोहळ्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळालेला नाही. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं (shilpa shetty) नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित त्यांचे आभार आणि कौतुक केलं आहे.

शिल्पा शेट्टीने एक पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने भारतातील कोट्यवधी लोकांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आहेत. शिल्पाचे हे पत्र महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?
‘आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहासातून शिकतात, पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात. तुम्ही 500 वर्षाचा इतिहास बदलला आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
रामलल्लाच्या या सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. अरुण गोविल, सुनील लाहिरी, दीपिका चिखलिया, अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित, राजकुमार हिरे, राजकुमार हिरे यांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. गणेशपुजनानं या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मलायकाला राग अनावर; CM शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?
गौरी खानचे हॉटेल व्यवसायात पदार्पण; रेस्टॉरंटला नाव दिलं Torri, जाणून घ्या इनसाईड स्टोरी

हे देखील वाचा