Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड आईवर प्रेम करताना दिसल्या शिल्पा आणि शमिता, बिपाशा बासूनेही दिली प्रतिक्रिया; पाहा व्हिडिओ

आईवर प्रेम करताना दिसल्या शिल्पा आणि शमिता, बिपाशा बासूनेही दिली प्रतिक्रिया; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मग ती तिच्या सौंदर्याबद्दल असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. शिल्पा शेट्टी आणि तिची धाकटी बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांनी अनेकदा आपल्या आईवर किती प्रेम केले आहे आणि दोघीही तिच्या किती जवळ आहेत याचा खुलासा केला आहे. शमिता शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये शमिता तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टीसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ इतका क्युट आहे की, चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत त्यावर कमेंट करत आहेत. खरं तर, या व्हिडिओमध्ये दोन्ही बहिणी आपल्या आईवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही बहिणी त्यांच्या आई सुनंदा शेट्टीच्या वर पडल्या आहेत आणि तिची किस घेत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘क्या कहना’ चित्रपटाचे गाणे वाजत आहे. व्हिडिओ शेअर करत शमिताने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काही क्षण अनमोल असतात. काही तासांतच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो कमेंट्सही आल्या आहेत.

या क्यूट व्हिडिओवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही कमेंट्सही पाहायला मिळाल्या आहेत. पोस्टवर कमेंट करताना बिपाशा बसूने लिहिले की, “आम्ही आमच्या आईसोबत असेच करतो. खूप क्यूट.” तर शिल्पाने लिहिले आहे की, “तुम्हा दोघींची खूप आठवण येते.” दुसरीकडे, बिग बॉस १५ मध्ये शमिताची मैत्रिण आणि आता बेस्ट फ्रेंड बनलेली गायिका नेहा भसीनने लिहिले की, “माझ्या बाजूनेही एक आहे.” एकूणच चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांचे २००९ मध्ये झाले लग्न

शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. त्यानंतर ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अश्लील चित्रपट प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्राला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर करण्यात आले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘सुखी’ (Sukhi) या चित्रपटात शिल्पा दिसणार आहे. ज्याचा प्रोमो आणि पहिली झलक शिल्पाने तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. या प्रोमोवरून हे स्पष्ट झाले की, शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा एका अतिशय धमाल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा