Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘मी जाड होते म्हणून मलायकाला छैय्या छैय्या…’, तब्बल 25 वर्षांनंतर शिल्पाने तोडले मौन

‘मी जाड होते म्हणून मलायकाला छैय्या छैय्या…’, तब्बल 25 वर्षांनंतर शिल्पाने तोडले मौन

सध्या नव्वदच्या दशकातील एक अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून शिल्पा शिरोडकर आहे. शिल्पाने ‘किशन कन्हैया’, ‘प्रतीक्षा,’ ‘आँखे’, ‘खुदा गवाह’ आणि ‘गोपी किशन’ यांसारख्या यादगार सिनेमात काम केले आहे. बऱ्याच वर्षांनंतर तिने तिच्या मनातील वेदना मोकळ्या केल्या आहेत. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) हिने सांगितले की, एक काळ असा होता, जेव्हा तिला इंडस्ट्रीत जाडी म्हटले जायचे. तिने असेही सांगितले की, 1998 सालच्या ‘दिल से’ (Dil Se) सिनेमातील ‘छैया छैया’ (Chaiyya Chaiyya) या सुपरहिट गाण्यासाठी तिला कास्ट केले जाणार होते. मात्र, जाड असल्यामुळे या गाण्यात तिच्या जागी मलायका अरोरा (Malaika Arora) हिला कास्ट करण्यात आले होते.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जेव्हा शिल्पाला विचारण्यात आले की, तिने ‘छैय्या छैय्या’ गाणे कसे काय सोडले? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, “अशी संधी हातातून निसटावी असे कुणाला वाटते. फराह खान या गाण्याची ऑफर घेऊन माझ्याकडे आली होती. मात्र, नंतर समजले की, मी यासाठी खूपच जाड होते, त्यामुळे हे गाणे मलायकाला मिळाले.”

शिल्पाने असेही सांगितले की, जेव्हा ती काम करत होती, तेव्हा तिचे वजन तिच्या कामाच्या मध्ये कधीच आले नाही. मात्र, आता पदार्पण करायचे असेल, तर मला कदाचित काम मिळणार नाही. तिचे असे म्हणणे आहे की, आता स्पर्धा एवढी वाढली आहे की, कुणीही कुणाला दुसरी संधी देत नाही.

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “माझ्या सर्व सहकलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांसह संपूर्ण इंडस्ट्रीच्या पाठिंब्यामुळे मी जे काही बनू शकले, ते बनले. अनिल कपूर एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेले होते आणि ते त्यांच्यासोबत माझा फोटो अल्बमही घेऊन गेले होते. जेणेकरून निर्माते पाहू शकतील. त्यानंतर मला तो सिनेमा मिळाला होता.”

मिथुन चक्रवर्ती यांचे नाव घेत अभिनेत्री भावूक झाली. ती म्हणाली की, “मिथुन दामुळेच मी या इंडस्ट्रीत आहे. जेव्हा माझ्याकडून ‘सौतन की बेटी’ आणि ‘जंगल’ सिनेमे निसटले, तेव्हा लोक माझी खिल्ली उडवू लागले होते. मिथुन दाच होते, ज्यांनी मला ‘भ्रष्टाचार’ सिनेमात रोल दिला आणि माझी कारकीर्द रुळावर आली.”

शिल्पाने 2000मध्ये थाटला संसार
खरं तर, शिल्पाने यूकेतील एका बँकेत काम करणाऱ्या अपरेश रंजीत याच्याशी 2000मध्ये संसार थाटला होता. त्यानंतर ती त्याच्यासोबत शिफ्ट झाली होती. त्यांना एक मुलगीदेखील आहे. तिचे नाव अनुष्का आहे.

शिल्पाची बहीण नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) हिचे लग्न साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्यासोबत झाले होते. ते दोघे जेव्हाही लंडनला जातात, तेव्हा शिल्पासोबत वेळ घालवतात. शिल्पादेखील त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Actress shilpa shirodkar reveals why she lost from chaiyya chaiyaa know here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाळेत रात्री मोठ्या आवाजात गाणे वाजताच संतापले दिग्दर्शक; पोलिसांना टॅग करत म्हणाले, ‘कान फाटणाऱ्या…’
‘काहीही होऊ दे, माझं…’, म्हणत समंथा भर कार्यक्रमात ढसाढसा रडली; व्हिडिओ जोरदार व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा