Sunday, May 19, 2024

दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. यामुळे अभिनेता पूर्ण तुटला आहे. तो आपल्या आईच्या खूपच जवळ होता, त्यामुळे आईच्या निधनाचा महेशला मोठा धक्का बसला आहे. अनेक नातेवाईक आणि टॉलिवूड कलाकार अभिनेत्याचे सांत्वन करत आहेत. हा क्षण अभिनेत्याच्या कुटुंबासाठी खूपच कठीण आहे. आपल्या आईच्या आठवणीत महेश बाबूची बहीण मंजुला घट्टमनेनी हिने एक पोस्ट लिहिली आहे, जी वाचून प्रत्येकाचे डोळे पाणावतील.

सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याची आई इंदिरा देवी (Indira Devi) ही मागील काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत जास्तच बिघडल्यानंतर त्यांना काही काळासाठी व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मंगळवारी (दि. 27 सप्टेंबर) सकाळी 4 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि जगासोबतच आपल्या जवळच्या व्यक्तींचा निरोप घेतला. महेश बाबू याची बहीण आणि निर्माती मंजुला घट्टमनेनी (Manjula Ghattamaneni) हिने आपल्या आईला भावूक श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा- धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन

मंजुलाची पोस्ट
मंजुला हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आईला श्रद्धांजली वाहिली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी जे काही केले, मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे. आम्ही नशीबवान आहोत की, आई म्हणून आम्हाला तुमचे प्रेम मिळाले. आज जरी तुम्ही आमच्यात नसला, तरीही तुम्ही नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहाल.”

दीर्घ आजारपणामुळे निधन
माध्यमांतील वृत्तांनुसार, इंदिरा देवी या वयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होत्या. इंदिरा देवी, या साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नानंतर त्यांना 5 मुले झाली होती. या पाच मुलांमध्ये महेश बाबू चौथ्या क्रमांकाचा मुलगा आहे. त्यानंतर कृष्णा यांनी इंदिरा यांना घटस्फोट देऊन अभिनेत्री विजया निर्मला यांच्याशी लग्न केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् आईच्या शुभेच्छा दुसरीकडं; रणबीरचे गोडवे गात म्हणाल्या, ‘शक्ती अस्त्र’
साऊथच्या अभिनेत्रींसोबत घडली धक्कादायक घटना! मॉलमध्ये प्रमोशनसाठी गेल्यावर गर्दीतच…

हे देखील वाचा