उन्हाळा संपला आहे आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशामध्ये वाटेवरून धड चालताही येत नसल्याने सामान्य नागरिकांसोबतच, कलाकारही त्रस्त झाले आहेत. पावसामुळे काहीठिकाणी रस्त्यांवर कसे खड्डे झाले आहेत, हे एका अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दाखवले आहे. तिने शेअर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
ही अभिनेत्री इतर कुणी नसून तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी सिनेमात काम केलेली दाक्षिणात्य अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) आहे. श्रद्धा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती दरदिवशी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली चाळण पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचे हे इंस्टाग्राम रील वेगाने व्हायरल होत आहे. तसेच, यामध्ये ती मुंबईच्या चिखलातील रस्त्यातून पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
मुंबईच्या रस्त्यांवर कलाकार करतात सामान्य लोकांप्रमाणे संघर्ष
श्रद्धा आर्या हिने व्हिडिओ (Shraddha Arya Video) शेअर करत लिहिले की, “पावसाचे दिवस म्हणा किंवा पाऊस पडताना आपण मुंबईच्या रस्त्यांवर कसे चालतो.” खरं तर तिने मुंबईतील परिस्थिती दर्शवली आहे. तसेच, कॅप्शनसोबतच तिने #MonsoonReels आणि #SareeReels असे हॅशटॅग्जही दिले आहेत. या व्हिडिओत अभिनेत्रीने नारंगी रंगाची साडी आणि डीप नेकलाईन ब्लाऊजमध्ये पळताना दिसत आहे. नेटकऱ्यांना दाखवण्यासाठी तिने कॅमेऱ्याकडे पाठ दाखवत आपला हा व्हिडिओ शूट केला आहे. ती चिखलातील रस्त्यात छत्री घेऊन आपल्या कामावर जाताना दिसत आहे. श्रद्धाच्या या व्हिडिओवरून समजते की, ती जरी आलिशान आयुष्य जगत असली, तरी रस्त्यांवर त्यांनाही सामान्य लोकांप्रमाणे संघर्ष करावा लागतो.
अभिनेत्रीची कारकीर्द
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘कुंडली भाग्य’ मालिकेमध्ये डॉ. प्रीता हिच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तिने ‘कलवणीन कधली’ या तमिळ सिनेमातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. यामध्ये सूर्या आणि नयनतारा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-