Tuesday, July 9, 2024

‘कोणाचीही नजर लागू नये’, अभिनेत्री श्रद्धा आर्याने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

पडद्यावर झळकणाऱ्या काही कलाकारांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये राजकुमार राव- पत्रलेखा यांच्या नावाचा समावेश आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या होय. श्रद्धाने नुकतेच आपला बॉयफ्रेंड राहुल नागलसोबत सात फेरे घेतले आहेत. श्रद्धाने आपल्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहतेही खुश झाले आहेत.

श्रद्धाने नुकतेच तिच्या पतीसोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये श्रद्धा लग्नानंतर आणखीनच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहते तर सोडाच, कलाकार मंडळीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Actress Shraddha Arya Shares Romantic Photos With Husband Rahul Nagal After Wedding)

रोमँटिक फोटो व्हायरल
श्रद्धा आर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नानंतर पती राहुल नागलसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. तिने या सूटसोबत खूप कमी दागिने कॅरी केले आहेत आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी, या फोटोंमध्ये राहुलने स्काय ब्लू शेरवानी घातली आहे. राहुल आणि श्रद्धाच्या या फोटोंवरून ते दोघे प्रेमात बुडाले आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते.

श्रद्धा आहे उत्साही
या फोटोंव्यतिरिक्त श्रद्धाने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल तिला अंगठी घालताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये नवरीचा उत्साहही व्यक्त केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर तुमचे लग्न झाले असेल आणि आनंदी असाल, तर हात वर करा.”

श्रद्धाच्या या पोस्टला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ५ हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊसही पडला आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, “कोणाचीही नजर लागू नये.” तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, “किती सुंदर जोडपं आहे.” याव्यतिरिक्त इतर चाहते या पोस्टवर हार्ट आणि स्माईल फेस विथ हार्ट शेप आईज इमोजींचा वर्षाव करत आहेत.

श्रद्धाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत हिंदी, तेलुगू चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. त्यात ‘निशब्द’ आणि ‘गोडवा’ चित्रपटाचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, क्यूटनेस पाहून चाहतेही दंग

-स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते मुकशे खन्नांकडून कंगनाची खरडपट्टी, अभिनेत्रीच्या वक्तव्याला म्हटले, ‘बालिश’

-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो

हे देखील वाचा