आहा कडकच ना! लग्नाच्या बेडीत अडकली श्रद्धा आर्या, पतीचे नाक दाबत अभिनेत्रीने केले मजेशीर फोटोशूट


‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) रोजी नवी दिल्लीमध्ये लग्न केले आहे. तिने तिचे नातेवाईक आणि जवळच्या काही मित्रांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा उरकला आहे. तिने नौदल अधिकारी राहुल शर्मासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नाच्या एक दिवसानंतर श्रद्धाने लग्नाचे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. तिचे हे ब्रायडल फोटोशूट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

श्रद्धाने तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. यावर तिने डोक्यावर दुपट्टा घेतला आणि गळ्यात हेवी ज्वेलरी घातली आहे. तसेच हातात चुडा भरलेला दिसत आहे, तर तिचा पती राहुल पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. त्या दोघांनीही गळ्यात हार घातले होते. (Actress Shraddha arya wedding photos viral on social media)

श्रद्धाने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती स्टेजवर तिच्या पतीसोबत सोफ्यावर बसलेली दिसत आहे. राहुलने तिला पकडलेले दिसत आहे, तर दुसऱ्या हाताने तिचा हात धरला आहे.

आणखी एका फोटोमध्ये श्रद्धा आणि राहुलने मजेशीर हावभाव दिले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा तिच्या पतीचे नाक दाबताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो अगदी मजेशीर दिसत आहे.

श्रद्धाने शेअर केलेल्या आणखी एका फोटोमध्ये ती सप्तपती चालताना दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने “जस्ट मॅरिड,” असे कॅप्शन दिले आहे. तसेच हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तिच्या लग्नातील हे खास फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाद करा पण आमचा कुठं! जान्हवी कपूरच्या ‘पनघट’ गाण्यावर दोन मुलींचा जबरदस्त डान्स, तुम्ही पाहिला का?

-Video: फॉर्म्युला फोर कार रेसर अभिनेत्री ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत


Latest Post

error: Content is protected !!