Sunday, January 26, 2025
Home कॅलेंडर नाद करा पण आमचा कुठं! जान्हवी कपूरच्या ‘पनघट’ गाण्यावर दोन मुलींचा जबरदस्त डान्स, तुम्ही पाहिला का?

नाद करा पण आमचा कुठं! जान्हवी कपूरच्या ‘पनघट’ गाण्यावर दोन मुलींचा जबरदस्त डान्स, तुम्ही पाहिला का?

सोशल मीडिया हे आता केवळ एक संभाषणाचे साधन राहिले नसून आता ते आपले कलागुण सादर करण्याचे एक व्यासपीठ झाले आहे. खरं तर, कलाकारांसाठी हे एक वरदानच आहे. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट वेगाने व्हायरल होत असते. कोणताही फोटो असो किंवा व्हिडिओ असो सोशल मीडियावर तो शेअर करता क्षणीच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतो. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

यावर्षी मार्च महिन्यात जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांचा ‘रूही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘पनघट’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्याची क्रेझ सहसा तरुण मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. ही क्रेझ एवढी आहे की, काही मुलींनी या गाण्यावर डान्स करून त्याचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले आहेत. (YouTube girls dance on janhvi kapoor’s 0anghat song)

या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा या गाण्यावरील एक व्हिडिओ युट्यूब चॅनेल एसडीद्वारा अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली ‘पनघट’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ युट्यूबवर ६ मार्च रोजी अपलोड केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत.

या गाण्यातील जान्हवी कपूरच्या अदा पाहून आधीच सगळे प्रेक्षक फिदा झाले होते. या गाण्यात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा देखील दिसले होते. या गाण्याला सचिन जिगर यांनी कंपोझ केले होते. तसेच अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते. हे गाणे दिव्या कुमार, असीम कौर, जिगर आणि सचिन संघवी यांनी मिळून गायले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: फॉर्म्युला फोर कार रेसर अभिनेत्री ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा