Friday, July 5, 2024

बॉलिवूड इंडस्ट्रीत श्रद्धा कपूरला १२ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीने हिरव्या रफल साडीतील सुंदर फोटो केले शेअर

‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरने पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर यश मिळवले आहे. पाश्चिमात्य ते पारंपारिक प्रत्येक ड्रेसमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसते. अभिनेत्री श्रद्धाला बॉलिवूड इंडस्ट्रीत १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर सुंदर दिसत आहे. बॉलिवूडमध्ये १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कमेंट सेशनमध्ये तिचे जोरदार अभिनंदन होत आहे.

हिरव्या साडीत अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखाडी रंगाच्या रफल साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने या लाइट वेट प्रिंटेड साडीसह कट स्लीव्हज मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. या फोटोंमध्ये तिने गळ्यात आणि हातात काळ्या रंगाचे दागिने घातले आहेत. तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

https://www.instagram.com/p/Cacoyuepgk0/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूडमध्ये १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल चाहत्यांचे अभिनंदन

या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर वेगवेगळ्या पद्धतीने पोझ देताना दिसत आहे. तिच्या मागचे बॅकग्राउंड देखील खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, “बॉलिवुडमध्ये १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.” त्याचप्रमाणे दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “या इंडस्ट्रीत १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.” याशिवाय, इतर चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. चाहते त्याच्या पोस्टवर गॉर्जियस, प्रिटी-प्रिटी, क्यूटेस्ट, ब्यूटीफुल अशा कमेंट करत आहेत आणि हृदयाच्या इमोजीसह आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. जरी श्रद्धाचा चित्रपट फ्लॉप ठरला आणि तिला कोणतीही ओळख मिळाली नाही. परंतु त्यानंतर आलेल्या ‘आशिकी २’ चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवले. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर श्रद्धाने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती लव रंजनच्या ‘अनटाइटल्ड’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यानंतर आता ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटासाठीही ती चर्चेत आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा