Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी श्रद्धा कपूरचं आहे खास नातं

तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी श्रद्धा कपूरचं आहे खास नातं

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी त्यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. त्या बाॅलिवूडच्या एक चमचमता तारा होत्या. पण तुम्हाला माहितीये का, अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत (Shraddha Kapoor) लता मंगेशकर यांचं एक खास नातं होतं. आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 3 मार्च)ला श्रद्धा कपूरचा 35वा वाढदिवस आहे. चला तर मग त्यानिमित्त जाणून घेऊया लता मंगेशकर आणि अभिनेत्रीच्या खास संबधा विषयी.

लता मंगेशकरसोबत आहे श्रद्धाचे खास नाते
लता मंगेशकर यांचे श्रद्धा कपूरशी जवळचे नाते आहे. खरं तर श्रद्धा कपूरचे आजोबा म्हणजेच शक्ती कपूर यांचे वडील लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. यानुसार लता मंगेशकर ही श्रद्धा कपूरची आजी आहे. दोघांमध्ये भन्नाट बाँडिंग आहे. अभिनयाशिवाय श्रद्धाला गाण्याचीही खूप आवड आहे आणि ती अनेकवेळा तिच्या चित्रपटांमध्ये गाणे म्हणते. तिच्या ‘आजी’कडून तिला हा गुण मिळाला असल्याचे स्पष्ट होते. (do you know shraddha kapoor relationship with lata mangeshkar)

पहिला अभिनय आणि पहिल्या संगीताला केली ‘अशी’ सुरुवात
लता दीदींचे वडील नाट्यकलावंत देखील होते. एकदा त्यांच्या एका नाटकामध्ये घोळ झाला होता. गाणे गाऊन नारायणाचा अभिनय करणारा कलाकार तेथे उपस्थित नव्हता. नाटकाचा खेळ सुरू व्हायला आला होता, पण त्या कलाकाराला यायला आणखी उशीर होणार होता. त्यावेळी लता दीदी त्यांच्या वडिलांना म्हणाल्या की, “बाबा मी साकारू का नारायणाची भुमिका.” त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले “तू लहान आहेस बाळा.” दीनानाथ यांना असे वाटत होते, की लता दीदी गाऊ शकणार नाहीत. परंतु एकतरी संधी द्या, असे म्हणत लता दीदींनी हे काम मिळवले आणि त्यांच्या अभिनयाला व गाण्याला वन्स मोअर देखील मिळाला. त्यावेळी गायिका फक्त पाच वर्षांच्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चुका होणे माझ्या प्रवासाचा’ म्हणत सतत फ्लॉप चित्रपट देणाऱ्या सारा अली खानने सोडले मौन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा