Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सचिन पिळगावकरांची लेक ‘या’ वेबसीरिजमध्ये बनणार ‘सेक्स वर्कर’, भुवन बामही लावणार अभिनयाचा तडका

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे. आता त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही देखील सिनेसृष्टी गाजवत आहे. श्रिया ही ‘गिल्टी माईंड्स’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ यांच्या अफाट यशामुळे श्रिया वेबसीरिज जगतातील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. श्रियाची गणना इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांमध्ये होते. आपल्या कारकीर्दीचा आलेख पुढे जात असतानाच श्रियाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) डिझ्नी + हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ‘ताजा खबर’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रसिद्ध युट्यूबवर भुवन बाम, जे. डी. चक्रवती, देवेन भोजानी, प्रथमेश परब, नित्या माथुर आणि शिल्पा शुक्ला हे कलाकारदेखील आहेत. श्रिया या वेबसीरिजमध्ये नवीन भूमिकेत झळकणार आहे. श्रिया कॉमेडी-नाटक सीरिजमध्ये आपल्या पात्रामार्फत ती काय नवीन घेऊन येते, हे पाहणे रंजक ठरेल.

सीरिजची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर श्रिया पिळगावकर म्हणाली की, “ताज्या बातम्यांसाठी शूटिंग करणे हा खूप मजेदार अनुभव होता. मला कॉमेडी-नाटक आवडते आणि हा एक प्रकार आहे जो मी खरोखर केला नाही. मी सेक्स वर्करची भूमिका करत आहे. माझे पात्र आणि लूक पूर्णपणे भिन्न आहेत. मला भुवन आणि या संपूर्ण कलाकार आणि क्रूसोबत काम करायला आवडते, जे खूप प्रतिभावान आणि मेहनती आहेत. आम्ही त्याचे धमाकेदार चित्रीकरण केले आहे आणि प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही.”

श्रिया पिळगावकरची कारकीर्द
श्रियाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१३मध्ये आलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने सन २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमात तिच्यासोबत सुपरस्टार शाहरुख खान होता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘क्रॅकडाऊन सिझन २’, ‘द गॉन गेम सिझन २’ आणि ‘इश्क-ए-नादान’ या सिनेमातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून करोडो रुपयांची कमाई करणारे बॉलिवूड स्टार

काय सांगता! या सेलिब्रेटिंनी चक्क आपल्या फॅनशीच केलंय लग्न

बाबो! ऐश्वर्या रायला ‘राणी’ बनवायला लागले ६ महिने, ‘या’ मौल्यवान रत्नांचा करण्यात आलाय दागिन्यांत वापर

हे देखील वाचा