प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन देखील काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. श्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. श्रिया सरनचा तिच्या पतीसोबतचा एक नवीन व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल भयानीच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, जेव्हा श्रिया सरन तिच्या परदेशी पतीसोबत पॅपराजीसमोर पोझ देत आहे, त्याचवेळी अचानक तिचा नवरा तिला किस करू लागतो. दोघेही कॅमेऱ्यासमोर रोमँटिक होतात आणि त्यांचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. त्याचबरोबर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मंगळवारचा (२४ ऑगस्ट) आहे. जेव्हा श्रिया तिच्या पतीसोबत वांद्रे येथील एका कॅफेच्या बाहेर दिसली होती. श्रियाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. (Actress Shriya Saran got romantic with her husband while taking photos)
अभिनेत्री श्रिया सरनचा जन्म ११ सप्टेंबर, १९८२ रोजी देहरादून येथे झाला होता. श्रिया सरनचे बालपण हरिद्वारमध्ये गेले. त्याचबरोबर श्रियाने तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या अभिनयाच्या जोरावर जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. २००७ मध्ये रजनीकांत यांच्या ‘शिवाजी: द बॉस’ या चित्रपटाने तिला बरीच लोकप्रियता मिळाली होती. दाक्षिणात्य चित्रपटासोबतच श्रियाने बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे. ती ‘अवर्णन’ आणि ‘दृष्यम’ सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय करताना दिसली होती.
श्रियाने साल २००१ मध्ये तेलुगू ‘इष्टम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिला २००२ मध्ये ‘संतोषम’सह तिला पहिले व्यावसायिक यश मिळाले. श्रिया ही दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने आता पर्यंत ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस
-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट
-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल