मराठी मालिका क्षेत्रात सध्या ‘मुलगी झाली हो’ मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. याआधी मालिकेतील कलाकार किरण मानेला (Kiran Mane) तडकाफडकी काढल्याने ही मालिका सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी मालिकेवर चांगलीच टीकाही झाली होती. त्यानंतर अलिकडेच मालिकेत भूमिका करणारा अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने या मालिकेला राम राम ठोकला आहे त्यामुळे ‘मुलगी झाली हो’ मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ मालिका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच ही मालिका बंद पडणार असल्याच्याही बातम्या रंगल्या होत्या. त्यानंतर ही मालिका दुपारच्यावेळी प्रसारित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मालिकेतील अभिनेते अजय पुरकर यांनी मालिका सोडल्याने पुन्हा एकदा कार्यक्रमाची चर्चा झाली होती. त्यानंतर आता लगेच अभिनेत्री श्वेता आंबिकरनेही (Shweta Ambikar) या मालिकेला राम राम ठोकला आहे. एकाच आठवड्यात दोन कलाकारांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान अभिनेत्री श्वेता आंबिकरने या मालिकेत आर्याची भूमिका साकारली होती. पहिल्यापासूनच प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेला आणि दमदार अभिनयाला जोरदार प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांचाही या बातमीने चांगलाच हिरमोड झाला आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीने हा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. याआधी मालिकेतील अभिनेता किरण माने यांनीही मालिकेवर टिका केल्याने जोरदार चर्चा झाली होती. अनेकांनी यावर मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले होते. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी मालिकेचा प्राईम टाईम बंद झाल्यानेही खरमरीत टीका केली होती. त्यामुळे विविध कारणांनी ही मालिका कायमच चर्चेत येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- लग्नानंतर दोन दिवसांनी हळदीच्या अंगाने ‘हुनारबाज’च्या मंचावर अवतरले रणबीर-आलिया, पाहून नीतू कपूर झाल्या शॉक
- बाबो! आलिया भट्टचा लेहेंगा बनवायला लागलेत तब्ब्ल ३००० तास, डिझाईन करायला वापरलंय खरं सोनं आणि चांदी
- ‘जेव्हा आयुष्य परीक्षा घेत होते तेव्हा मलायकाने मला मजबूत केले’, अर्जुन कपूरने केला अनुभव शेअर