टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये श्वेता तिवारी हिच्या नावाचाही समावेश होतो. श्वेता ही तिच्या अभिनयाव्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्यांवर तिचे परखड मत मांडते. मग तो मुद्दा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असो किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल असो. श्वेता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. अशात तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. व्हिडिओत श्वेता असे म्हणताना दिसत आहे की, समाजातील लोकांनी प्रत्येक गोष्टीबद्दल आपापली मते तयार केली आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत श्वेता तिवारी (Shweta Tiwari) म्हणत आहे की, “असे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत, जे घरी पत्नी असूनही बाहेर गर्लफ्रेंड ठेवतात. तसेच, अनेक महिला अशाही आहेत, ज्यांच्या घरी पती असतो आणि बाहेर एक बॉयफ्रेंड. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली मी आहे. कमीत कमी मोकळेपणाने सांगू शकते की, मला तुझ्यासोबत राहायचे नाही.” एवढंच बोलू श्वेता थांबली नाही, तर ती पुढे म्हणाली की, लोकांना जे हवंय, ते मला नाही करायचे. मला ते काम करायचे आहे, जे मला ठीक वाटते. मग ज्याला जे वाटेल, त्याने ते माझ्याबद्दल बोलावे आणि लिहावे.”
View this post on Instagram
‘पुन्हा आयुष्य जगण्यास घाबरतात महिला’
श्वेताने पुढे बोलताना म्हटले की, “मला त्या महिलांसाठी उभे राहायचे आहे, ज्या आपले आयुष्य पुन्हा जगण्यापासून घाबरतात. त्या महिलांना फक्त या गोष्टीची चिंता सतावते की, लोक काय विचार करतील?, त्या स्वत:मध्ये गुंफून राहतात. घाबरतात आणि मुलांनाही चांगल्याप्रकारे वाढवू शकत नाहीत. फक्त याबद्दल विचार करून की, शेजारचे त्यांच्याबद्दल काय म्हणतील? त्यामुळे महिलांनो, यातून बाहेर पडा आणि कशाचीही पर्वा करू नका.”
श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे, श्वेताने दोन लग्न केली आहेत. तिचे पहिले लग्न राजा चौधरी याच्यासोबत झाले होते. त्यानंतर तिने राजासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनव कोहली याच्यासोबत संसार थाटला होता. आता ती सिंगल आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजाकडून तिला मुलगी पलक तिवारी आहे, तर अभिनवकडून तिला मुलगा रेयांश कोहली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक
‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य
अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय