Wednesday, March 29, 2023

‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूड कलाकार कधी काय बोलतील, याचा काही नेम नाही. कधी ते एखाद्याची प्रशंसा करतात, तर कधी ते असे काही बोलून जातात त्यामुळे एकच खळबळ माजते. आताही असेच काहीसे घडले आहे. बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना हे सध्या चांगलेच सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या विषयावर त्यांचे मत मांडत असतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केले आहे, ते ऐकून चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण…

अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते म्हणत आहेत की, “जी मुलगी कोणत्याही मुलाला सेक्स करण्यासाठी म्हणत असेल, तर ती धंदा करत आहे. अशा गोष्टींमध्ये लोकांनी अडकले नाही पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Buzz (@cricbollybuzz)

‘तो त्या मुलीचा धंधा आहे’
मुकेश खन्ना हे ‘शक्तिमान’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, “जर कोणतीही महिला कोणत्याही मुलाला म्हणत असेल की, मला तुझ्यासोबत शारीरिक संंबंध ठेवायचे आहेत, तर तो तिचा धंदा आहे. कारण, कोणत्याही सभ्य समाजातील मुलगी असे म्हणणार नाही. जी मुलगी असे म्हणते, ती निर्लज्ज आहे. तुम्ही तिच्या पापात सामील होऊ नका.”

नेटकऱ्यांनी केले ट्रोल
मुकेश खन्ना यांच्या या व्हिडिओवर नेटकरी त्यांना चांगलेच खडसावत आहेत. एका युजरने म्हटले की, “ठीक आहे शांत व्हा, आता एक व्हिडिओ बनवा सभ्य समाजातील मुलावर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “रुढीवादी विचार कायम राहो.” आणखी एकाने लिहिले की, “मुलांबाबत काही लिहिले नाही.”

खरं तर ट्रोल होण्याची मुकेश खन्ना यांची ही पहिलीच वेळ नाहीये. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा ट्रोल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय
रणबीरची आलिया आहे लईच खमकी! अवघड सीनसाठी आजारी असूनही झालेली तयार, आख्ख्या सेटने वाजवलेल्या टाळ्या
डेंग्यू शेर, तर कंगना सव्वाशेर! आजारपणातही काम करतेय ‘पंगा क्वीन’, शूटिंगदरम्यानचा फोटो व्हायरल

हे देखील वाचा