Saturday, June 29, 2024

फक्त लढ म्हणा! ‘मिर्झापूर ३’मध्ये पाहायला मिळणार गोलू पंडितची दमदार भूमिका, जिममध्ये करतेय बॉक्सिंग प्रॅक्टिस

कलाकार हे नेहमीच त्यांच्या आगामी सिनेमासाठी किंवा वेबसीरिजसाठी खूप मेहनत घेतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या आगामी वेबसीरिजसाठी जिममध्ये कसून मेहनत घेत आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून श्वेता त्रिपाठी आहे. तसेच, ती वेबसीरिज दुसरी-तिसरी कोणती नसून ‘मिर्झापूर ३‘ आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता या वेबसीरिजचा तिसरा भाग चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी यासाठी तयारी जोरात सुरू केली आहे. श्वेता यामध्ये गोलू पंडित हे पात्र साकारत आहे. अशात तिचा जिममधील बॉक्सिंगचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

श्वेता त्रिपाठीने सुरू केली मिर्झापूर ३ची तयारी
‘मिर्झापूर’ वेबसीरिजमध्ये गोलू पंडित (Golu Pandit) हे पात्र खूपच खास आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागात सर्वांनी पाहिले की, गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलच्या खांद्याला खांदा लावत श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) उभी होती. अशात या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागातही या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकतेच श्वेताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत श्वेता त्रिपाठी तिच्या ट्रेनरसोबत बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक टॅगलाईनदेखील आहे, ज्यावर ‘गोलू ३.० तयार’ असे लिहिले आहे. यावरून स्पष्ट होते की, ‘मिर्झापूर ३’मध्ये गोलू पंडितची भूमिका सर्वात वेगळी आणि जबरदस्त असणार आहे. श्वेताच्या या व्हिडिओला चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridev Pandey (@tridevpandey)

केव्हा प्रदर्शित होणार ‘मिर्झापूर ३’
काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर ३’ वेबसीरिजच्या शूटिंग सेटवरून काही फोटो समोर आले होते. यावरून समजते की, ऍमेझॉन प्राईमवरील या वेबसीरिजच्या पुढील भागाची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या दोन भागांच्या जबरदस्त यशानंतर निर्माते ‘मिर्झापूर ३’ घेऊन येत आहेत. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नाहीये. असे म्हटले जात आहे की, ही वेबसीरिज पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
आलियाचं प्रेग्रेंसी फोटोशूट! बेबी बंप प्लॉंन्ट करताना दिसली अभिनेत्री
प्रेग्नेंसीनंतर ‘या’ बिगबजेट चित्रपटातून काजल अग्रवाल करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा
‘देश बदलला आहे’, अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केलेला काश्मिरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा