Friday, April 19, 2024

प्रेग्नेंसीनंतर ‘या’ बिगबजेट चित्रपटातून काजल अग्रवाल करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा

साऊथमधील सुपरस्टार काजल अग्रवाल (Kajal Agrawal) ही प्रेग्नेंट असल्यामुळे तिने फिल्मी दुनियेला विश्रांती दिली होती, पण ती प्रेग्नेंट असतानाही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायची, आणि ती सध्या चित्रपटामध्ये पदार्पण करण्याची चर्चा खूप दिवसांपासून होताना दिसत आहे. नेहा धुपिया आणि काजल अग्रवाल या दोघी एका लाईव्ह सेशनमध्ये एकत्र आल्या होत्या तेव्हा काजल अग्रवाल ने शेवटी मौन तोडले तिच्या फिल्मी दुनियेत पुनरागमनाबद्दलची जी बातमी पसरत आहे. ती खरी आहे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या लाईव्ह सेशनमध्ये काजलने तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाचीही माहिती दिली. 

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सिनेगजातपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्सिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच ती तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. अलिकडेच ती एका लाईव्ह सेशनमध्ये नेहा धुपियाबरोबर झळकली होती. आणि या लाईव्ह सेशनमध्ये तिने तिच्या फिल्मी दुनियेत पदार्पण करण्याची बातमी दिली.ती म्हणाली की , “मी कमल हसन यांच्या इंडीयन २या चित्रपटामधून  पुन्हा पडद्यावर झळकणार आहे, आणि या चित्रपटाची शुटींग याच वर्षी १३ सप्टेंबरपासून सुरुवात करणार आहे ” ही गोष्ट ट्विटरवर ही बातमी खूपच व्हायरल होत आहे.आणि काजलच्या या वक्तव्याने तिचे चाहते देखील खुपच खुश आहेत आणि तिच्या येणाऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहे.

दरम्यान, काजल अग्रवालने यावर्षी एप्रिल महिन्यात मुलाला जन्म दिला आहे. अशा परिस्थितीत गरोदरपणामुळे काजल बराच काळ चित्रपट जगतापासून दूर होती. काजल अग्रवाल शेवटची जॉन अब्राहमच्या मुंबई सागामध्ये दिसली होती. पण आता काजल कमल हसनसोबत इंडियन 2 या चित्रपटात दिसणार आहे. इंडियन 2 हा कमल हासन यांच्या  1996 च्या भारतीय चित्रपटाचा सिक्वेल आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणच्या नावाचीही चर्चा होती.

हेही वाचा –

‘देश बदलला आहे’, अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केलेला काश्मिरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

उर्फी जावेदची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केले दाखल

सुष्मिताच्या हॉटनेसने ललित मोदी क्लिनबोल्ड, व्हायरल व्हिडिओवर दिलेल्या ‘त्या’ कमेंटची रंगली चर्चा

हे देखील वाचा