Wednesday, July 3, 2024

‘…लहान तोंडी मोठा घास!’, पाहा असं का म्हणाली मराठमोळी आर्या आंबेकर

चित्रपटसृष्टीमध्ये ‘ब्युटी विद टॅलेंट’ खूप कमी अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळते. यातीलच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर (Aarya Ambekar). आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते. ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’मधून नावारूपाला आलेली आर्या खूपच सुंदर दिसते. तिच्या अदा पाहून कोणीही स्वतःला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत नाही. आर्या आंबेकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर्या आंबेकर योगा करताना दिसत आहे. जो करताना ती खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती गुडघ्यावर तिचा तोल सांभाळत मागच्या दिशेने खाली झोपताना दिसत आहे. पण मध्येच ती तोल सांभाळण्यास अयशस्वी ठरते आणि लगेच व्हिडिओ देखील थांबतो. या व्हिडिओमध्ये आर्याने शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

त्याचवेळी आर्याने शेअर करत एक खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले की, “Being a beginner at working out , this is लहान तोंडी खूपच मोठा घास,” असं कॅप्शन दिले आहे. “योगप्रकार करताना काळजी घ्या, नाही तर उगाच माझ्यासारखं होईल, असे देखील तिने सांगितले आहे.

‘सा रे ग म प’च्या प्रवासानंतर आर्या आंबेकर हिने अनेक मालिकांचे शीर्षकगीत, तसेच चित्रपटात गाणे गात आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. आर्याने ‘जरा जरा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कितीदा नव्याने’, ‘ओ साजणा’ यांसारखी गाणी गायली आहेत. यासोबतच तिने अनेक मालिकांचे टायटल सॉंग्स गायले आहेत. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा