×

द्वारका | स्पृहा जोशीच्या कविता संग्रहातील आणखी एक कविता प्रेक्षकांच्या भेटीला

स्पृहा जोशी ही मराठीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. अगदी कमी वयात तिने यश प्राप्त केले आहे. एक उत्तम अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि आता एक उत्कृष्ट लेखिका आणि कवयित्री म्हणून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या नवनवीन कवितांचा आस्वाद ती नेहमीच चाहत्याना देत असते. कधी तिने लिहिलेल्या तर कधी दिग्गज कवींच्या कविता ती आपल्याला ऐकवत असते. स्पृहाने तिचे एक यूट्यूब चॅनेल चालू केला आहे. अशातच तिचा आणखी एक कविता समोर आला आहे. स्पृहाने तिच्या कवियित्री यूट्यूब चॅनेल वरून एक कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती अत्यंत सुंदर ‘द्वारका’ ही कविता तिच्या लयबद्ध भाषेत म्हणताना दिसत आहे.

स्पृहाने शेअर केलेली ही कविता ज्येष्ठ कवयित्री प्रभा गडूरकर यांची ही कविता आहे. या कवितेत ती म्हणते की, “पाणी हलले जरा, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा. खोल आतल्या आत गुदमरले हुंदके सारी निखानिख करावी लागली तेेव्हा. डोळ्याबाहेरही आले दोन थेंब, उरल्या आयुष्याइतकोच अल्पजीवी.”

अशाप्रकारे तिने ही कविता अत्यंत सुंदर पद्धतीने मांडली आहे. अनेकांना ही कविता आवडली देखील आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. या व्हिडिओसाठी तिच्या चाहत्यांनी तिच्याकडे फरमाईश केली होती.

स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

Latest Post