Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘जास्त पोर्न बघणारे लोक नीट किस करू शकत नाहीत,’ ‘या’ अभिनेत्रीने केला तिच्या पहिल्या किसचा अनुभव शेअर

‘जास्त पोर्न बघणारे लोक नीट किस करू शकत नाहीत,’ ‘या’ अभिनेत्रीने केला तिच्या पहिल्या किसचा अनुभव शेअर

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी विवादास्पद वक्तव्याने या अभिनेत्री प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये अभिनेत्री सोफिया हयातचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अभिनेत्री सोफियाने पोर्न पाहणार्‍या लोकांविषयी एक धक्कादायक विधान केले आहे ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सोफिया हयात(sofia hayat) हिंदी चित्रपट क्षेत्रात मोजकेच चित्रपट केले आहेत. त्यापेक्षा जास्त ती तिच्या बोल्ड फोटोने आणि विवादास्पद बोलण्याने चर्चेत आली होती. त्याच बरोबर ती सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ मध्येही सहभागी झाली होती. यावेळी तिने सलमान खान आणि करण जोहरवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा एकदा सोफिया तिच्या बोल्ड वक्तव्याने चर्चेत आली आहे.

हेही पाहा –सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना सोफियाने पोर्न पाहणार्‍या लोकांशी संबधित एक गोष्ट सांगितली होती. यामध्ये ती म्हणते की, “सगळ्यात जास्त पोर्न पहाणार्‍या लोकांना किस करता येत नाही.”या विषयी तिने स्वतःचा अनुभव सांगताना ती म्हणते की, “मी 18 वर्षाची असताना एका मुलाला किस केला होता. त्या मुलाने माझ्या डोळ्यात पाहिले आणि माझ्या जवळ आला यावेळी मी खूप घाबरली होती. त्या मुलाने मला खूप घाणेरड्या पद्धतीने किस केले जे मला अजिबात आवडले नव्हते. मात्र यानंतर मी दुसर्‍या एका व्यक्तीला भेटले त्याने एकदम गोड किस केला असेच किस मला आवडतात ज्यामध्ये खूप ऊर्जा आणि उत्तेजना असते. मला असे वाटते की, जे पुरुष पोर्न बघतात ते नीट किस करू शकत नाहीत.”

याबद्दल पुढे बोलताना सोफियाने तिला आवडणार्‍या किस स्टाइल बद्दलही मत व्यक्त केले.”जर एखादी व्यक्ति वासना ठेवून तुम्हाला किस करत असेल तर ते खूप खराब आहे. महिलांना जास्त भावना असतात त्यांना पुरुषांचा हेतू लगेच समजतो असेही ती यावेळी म्हणाली.” अभिनेत्रीच्या या विवादास्पद बोलण्याने आता सगळीकडे चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा