Wednesday, March 29, 2023

तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्री सोहा अली खान होती इतके वर्ष अभिनयापासून लांब

जवळपास सहा वर्षं अभिनयापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खान आता ‘कौन बनेगा शिखरवती’ या वेब सीरिजमधून पुनरागमन करत आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “आता मला अभिनयाच्या दुनियेत परत यायचे आहे. मला जाणवले की, या क्षणी मी एक आई आणि एक अभिनेत्री अशा दोन्ही भूमिका करू शकते.”

लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे झाला होता आनंद

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “अनेकदा लोक मला विचारतात की, मी बाहेर का जात नाही? मी काम का करत नाही? मी दुसरे पुस्तक का लिहित नाही? कोरोनामुळे लॉकडाऊन लागले, त्यामुळे मला आनंद झाला, कारण मला त्या लोकांना उत्तर द्यावे लागले नाही. काही काळानंतर हळूहळू गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. पण मग मला या शोची ऑफर मिळाली. तोही जेव्हा कोरोना शिखरावर होता. पण आम्ही राजस्थानमध्ये बायो बबल बनवून तिथे ते शूट करण्यात यशस्वी झालो.”

मी आता तयार आहे – सोहा

“अभिनय हा वेळ घेणारा व्यवसाय आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे,” असे सोहा म्हणते. “यासाठी १२-१४ तास घरापासून दूर राहावे लागेल, पण आता मी तेवढा वेळ देऊ शकते.”

का ब्रेक घेतला?

“कुणाल चोवीस तास शूटिंग करत आहे. अशा परिस्थितीत मुलांबरोबर पालकांपैकी एकाने राहणे आवश्यक होते. त्यामुळे मी अनेक ऑफर नाकारल्या. कारण त्यावेळी माझ्या मुलीला माझी गरज होती. पण आता ती एकटी राहू शकते. त्यामुळे यावेळी मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकेन असे मला वाटते.”

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी सोहाने (Soha Ali Khan) ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. मुलगी इनायाच्या जन्मानंतर तिने २०१८ मध्ये आलेल्या ‘साहेब, बीवी और गँगस्टर ३’ नंतर ब्रेक घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
माता दुर्गाच्या पुजेला बॉलिवूड कलारांची गर्दी, देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचले ‘हे’ दिग्गज कलाकार
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…

हे देखील वाचा