Monday, June 17, 2024

एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर ही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा फोटो शेअर करून इंटरनेटवर आग लावते. अलीकडेच करीना मुलगा जेहसाेबत एअरपाेर्टवर दिसली. एकीकडे करीनाने तिच्या स्टाइलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले, तर दुसरीकडे तिच्या कूल बिहेविअरने चाहत्याचे मन जिंकले.

मात्र, सध्या करीना कपूर (Kareena Kapoor Khan) हिचा मुंबईतील एअरपाेर्टवरचा एक व्हिडिओ समाेर आला आहे. हा व्हिडिओ रविवार (दि. 2 ऑक्टाेबर) रात्रीचा आहे. या व्हिडिओमध्ये करीना पाढंऱ्या रंगाच शर्ट आणि स्लीवलेस स्वेटर घालून दिसत आहे. यासाेबतच तिने ट्रेक पॅंट आणि पांढऱ्या रंगाचे जाेडे घातले आहेत. केसांमध्ये करीनाने हाय बन टाकून सनग्लासेसे लावले आहेत. करीनाचा हा व्हाईट लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. करीनाचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. बेबाेचे चाहते, तिच्या या अनाेख्या लूकची स्थुती करत आहे.

फाेटाे काढण्यासाठी चाहत्यांनी घेरले करीनाला

बाॅलिवूड सेलेब्सला अनेकदा त्यांचे चाहते फाेटाे काढण्यासाठी त्रास देतात. बऱ्याचदा सेलेब्स नाराज हाेतात, तर बऱ्याचदा सेलेब्स चाहत्यांच्या या प्रेमाला मॅनेज करतात. करीना कपूरसाेबतही असेच काही घडले. जेव्हा ती एअरपाेर्टवरून निघाली, तेव्हा चाहत्यांनी तिच्यासाेबत फाेटाे काढण्यासाठी तिला घेरले. अशातच काही चाहते करीनाच्या अगदी जवळ पाेहचले. ज्याने बेबोला त्रास झाला पण तरीदेखील तिने त्याकडे दुर्लक्ष करत चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

काही यूजरने अभिनेत्रीला केले ट्राेल

एकिकडे काही यूजरला करीनाच एअरपाेर्ट लूक आवडलं, तर काही यूजरला करीना आणि जेह यांच्यातील अंतर आवडले नाही, तर झाले असे की, करीना आपल्या बॅगला घेऊन कारमधुन निघाली, त्याचवेळी मुलगा जेह नॅनीसोबत येताना दिसला. यामुळे काही युजर करीनाला यावरून ट्राेल करत आहे. एका युजरने कंमेट करत लिहिले की, “तिच्यासाठी मुलांहुन जास्त बॅग सांभळने गरजेच आहे.” करीना कपूरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर ती अखेरची ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसली हाेती. हा चित्रपट हॉलिवूड ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मिस इंडिया बनूनही मान्या सिंगला मिळेना काम, भाईजान करणार मदत?
साऊथच्या दिग्गजांसोबत झळकणार ‘आपला सिद्धू’, ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टिझर आला समोर

हे देखील वाचा