हटके! एका मिनीटात सोनाक्षाने बदलले ५ ड्रेस, व्हिडीओला सोशल मीडियावर मिळतायत लाखो हिट्स


बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या अभिनयसोबतच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे, फोटोमुळे व व्हिडिओमुळे सतत बातम्यांमध्ये येत असते. सोनाक्षीने सलमानसोबत २०१० मध्ये दबंग चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरु केली. तिने अभिनयात येण्यापूर्वी फॅशन डिझायनिंग केले आणि काही फॅशन शोमध्ये वॉक देखील केला.

सोनाक्षीला सुरुवातीला अभिनयात करियर करायचे नव्हते, तिला एक स्टेज परफॉर्मर व्हायचे होते. एकदा तिला स्टेजवर गाणं गाण्याची संधी देखील मिळाली आणि तिने त्या संधीचे सोने केले, तिने तिथे जबरदस्त परफॉर्मन्स दिला. सोनाक्षी अतिशय बिनधास्त आणि फुल ऑफ लाईफ मुलगी आहे. ती तिचे जीवन मनमुराद जगते. कधी ती मुंबईच्या रस्त्यांवर बाईक चालवतात, मध्यरात्री ती आईस्क्रिमच्या शोधात फिरते. ती नेहमी सर्वाना सांगते की, जिम करा पण खाणे पिणे सोडू नका’.

अनेकदा सोनाक्षी सोशल मीडियावर लाईव्ह देखील येत असते. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यावर मोठा वादंग उठला होता. त्यामुळे तिने मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी तिने तिचे ट्विटर अकाऊंट देखील बंद केले.

सध्या सोनाक्षी तिच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आली आहे. तिने तिचा एक कपडे बदलतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. यात ती एकामागोमाग एक कपडे बदलत आहे.

सोनाक्षीच्या फोटोशूटचा असणारा हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या मजेशीर व्हिडिओला फॅन्सकडून भरभरून लाईक्स मिळत असून हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच वायरल होत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.