[rank_math_breadcrumb]

मिर्झापूर द मुव्ही: विंटेज अंदाजात होणार ‘मिर्झापूर’चे पुनरागमन; आता नव्या ट्विस्टसह होणार भौकाली धमाका

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामधील कथाही ड्रामा, क्राईम, कथा या सर्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर या सीरीजला मिळणारे प्रेम लक्षात घेउन या सीरीजवर आधारीत एक चित्रपट येत आहे त्याचे नाव म्हणजे ‘मिर्झापूर: द मुव्ही’. या नव्या चित्रपट प्रवासाने प्रेक्षक, चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. ‘मिर्झापूर: द मुव्ही’, ज्यामध्ये अनेक जुनी आणि नवीन पात्रे दिसणार आहेत. तसेच यातील प्रत्येक पात्राला लोकांनी प्रेम दिले आहे. पण मागील सीरीज मधील सीन मध्ये मुन्ना भाईला गेल्याचे पाहुन प्रेक्षक नाराज झाले होते तर आता या चित्रपटात दिव्येंदू हा ते आपल्या लाडक्या ‘मुन्ना (munna)भैय्या’ या भूमिकेत परत येण्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आहे.

दिव्येंदू म्हणाला, कि हा चित्रपट एक पूर्णपणे व्हिंटेज मिर्झापूर असणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने परत येत आहोत. तुम्हाला पहिल्या सीझनमधील तीच पात्रं दिसतील, ती जशी होती तशीच असतील. पार्श्वभूमी अगदी तशीच आहे, पण परिस्थिती वेगळी आहे. तर हा चित्रपट एक भव्य स्वरुपाचा असणार आहे. आणि तो म्हणाला तिसऱ्या सीझनमध्ये माझ्या पात्राचा मृत्यू झाल्यापासून, लोक जुन्या हिंदी गाण्यांसोबत भावनिक रील्स बनवून, मला परत येण्याची विनंती करत होते.

मिर्झापूर: द मुव्ही’, हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. आणि हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

या सिरीजने ‘पंचायत’ला पण दिली टक्कर, 8.1 IMDb रेटिंगसह ही सिरीज ठरतीय प्रेक्षकांची फेव्हरेट