Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानने बोल्ड लूकमधील फोटो केले शेअर; चाहत्यांकडून मिळतेय पसंती

‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानने बोल्ड लूकमधील फोटो केले शेअर; चाहत्यांकडून मिळतेय पसंती

‘जन्नत’ चित्रपटाने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनल चौहान होय. सध्या जरी ती मोठ्या पडद्यावर कमी दिसत असली, तरीही सोशल मीडियावर तिच्या लूक्स आणि फॅशनच्या चर्चा रंगलेल्या असतात. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते. ती आपल्या फिटनेसवरही तितकेच लक्ष देते. ती नेहमी योगा पोझमधील फोटो शेअर करत असते. तिच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो खूप आवडतात. मात्र, तिने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

सोनलने दीर्घकाळानंतर आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अशाप्रकारचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या अदा एकदम जबरदस्त आहेत. (Actress Sonal Chauhan Bold Look On Bed)

असा आहे लूक
सोनल या फोटोंमध्ये काळ्या रंगाची बोल्ड बिकिनी परिधान करून बेडवर बसलेली दिसत आहे. बिकिनीवर तिने क्रीम रंगाचा श्रग घेतला आहे. श्रग एका खांद्यावरून खाली सरकला आहे आणि यामध्ये ती कमालीची आकर्षक दिसत आहे.

पोझ आहे परफेक्ट
सोनलने या फोटोत बसूनच पोझ देत आहे. तिच्या लूक्सनुसार, तिचे एक्सप्रेशन्स आणि पोझ तिला सूट करत आहेत. दुसऱ्या एका फोटोत ती गुडघ्यावर बसली आहे, तर तिचा एक हात मानेवर आहे. तसेच केस एकीकडे केले आहेत.

मेकअप आहे चांगला
सोनलचा आय मेकअप खूपच चांगला वाटत आहे. हा मेकअप तेव्हा हायलाईट होत आहे, जेव्हा ती खाली पाहून पोझ देत आहे. तिच्या लांब केसांची स्टायलिंगही खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आली आहे.

सोनलने हातात अंगठी घातली आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वन्स अपॉन अ गोल्डन आफ्टरनून.” तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

चाहत्यांनाही आवडतोय तिचा हा लूक
सोनलचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हे देखील वाचा