Monday, June 17, 2024

शाहरुख खानच्या लाडक्या लेकीने हटके अंदाजातील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले, ‘सूर्य आणि चंद्र…’

सोशल मीडियावर कलाकार जेवढे सक्रिय असतात तेवढेच सक्रिय स्टार किडही असतात. स्टार किड्समध्ये नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी आणि चर्चेत असणारी स्टारकीड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मित्रांसोबत फिरताना एन्जॉय करतानाचे फोटो ती शेअर करत असते. अशातच सुहानाने तिचा एक हटके फोटो शेअर केला आहे. ज्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे.

सुहाना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या काही मैत्रिणींसोबत दिसत आहे. पण तिच्या मैत्रिणींचा चेहरा फोटोमध्ये दिसत नाहीये. सुहानाने अत्यंत हटके पोझ देत हा फोटो काढला आहे. (Shahrukh Khan’s daughter Suhana khan’s latest photo viral on social media)

यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा वेगळा अंदाज खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ओएमजी! सूर्य आणि चंद्र एकाच फोटोत.”

सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने बॉलिवूडमध्ये अजून प्रवेश देखील केला नाही. पण तिचे फॅन फॉलोविंग कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाहीये. तिला इंस्टाग्रामवर तब्बल १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

https://www.instagram.com/p/CKlTQeqhX96/?utm_source=ig_web_copy_link

मागच्या वर्षी तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक केले आहे. त्यानंतर तिचे फॅन फॉलोविंग खूप वाढले आहे. सुहानाला तिच्या बोल्ड फोटोमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक वेळा ती तिच्या मैत्रिणींसोबत स्पॉट होत असते. शनाया कपूर, अनन्या पांडे आणि नव्या नंदा या सुहानाच्या खास मैत्रिणी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा