एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री असलेली सोनाली कुलकर्णी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सोनालीने आतापर्यंत अतिशय उत्तम चित्रपटांमध्ये तिने काम केले असून, ती छोट्या पडद्यावर देखील विविध शोच्या माध्यमातून दिसत असते. सुरुवातील उत्तम नृत्यांगना अशी ओळख कमवणाऱ्या सोनालीने तिच्या अभिनयाच्या प्रतिभेवरून एक उत्तम अभिनेत्री अशी ओळख देखील मिळवली आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणावर सक्रिय आहे. ती सतत तिचे पोट, व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या सोनाली ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ या कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळ आणि त्यांची वैशिष्ट दाखवली जात आहे. हा शो हिंदीमध्ये असून नुकताच सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शोची एक क्लिप शेअर केली आहे.
कोल्हापूरात आम्ही आमचा संस्मरणीय प्रवास सुरू करतो.
खऱ्या अर्थाने आई अंबाबाईची कृपा लाभलेले हे शहर संस्कृती,परंपरा,कलेचे माहेरघर आहे.
लवंगी मिरचीच्या मसाल्यापासून ते गुळाचा गोडवा,योद्ध्यांच्या धाडसापासून ते कारागिरांच्या कौशल्यापर्यंत हे शहर सर्व पुरवते.
आमच्या प्रवासात सामील व्हा pic.twitter.com/pLkkcA648p— सोनाली (@meSonalee) February 7, 2023
हिंदी का…..??
— आकाश (Ak) (@akchavan33) February 7, 2023
सोनालीचा हा नवीन शो ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’चा नुकताच पहिला भाग टेलिकास्ट झाला. याचा एक यूट्यूब व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आणि नंतर तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोनालीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, ““कोल्हापूरात आम्ही आमचा संस्मरणीय प्रवास सुरू करतो. खऱ्या अर्थाने आई अंबाबाईची कृपा लाभलेले हे शहर संस्कृती,परंपरा,कलेचे माहेरघर आहे. लवंगी मिरचीच्या मसाल्यापासून ते गुळाचा गोडवा,योद्ध्यांच्या धाडसापासून ते कारागिरांच्या कौशल्यापर्यंत हे शहर सर्व पुरवते. आमच्या प्रवासात सामील व्हा”. या व्हिडिओमध्ये ती कोल्हापूरबद्दल अधिक माहिती देताना दिसत आहे. तिच्यासोबत कुणाल विजयकर देखील आहे.
दुःखद आहे आम्ही मराठी जपण्यासाठी काय काय उपद्रव करतो ताई आणि आपण.. हिंदी आणि इंग्रजी वाल्यांनी कधी मराठी भाषेमध्ये काही केले आहे का आज पर्यंत ??
— आकाश (Ak) (@akchavan33) February 7, 2023
तिच्या या ट्विटवर एकाने ट्विट करत विचारले ‘हिंदी का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर सोनालीने उत्तर दिले “कारण हा कार्यक्रम हिंदी आणि English news channels साठी आहे”. सोनालीच्या या उत्तरावर पुन्हा त्या व्यक्तीने तिला एक प्रश्न विचाराला. तो म्हणाल, “दुःखद आहे आम्ही मराठी जपण्यासाठी काय काय उपद्रव करतो ताई आणि आपण.. हिंदी आणि इंग्रजी वाल्यांनी कधी मराठी भाषेमध्ये काही केले आहे का आज पर्यंत ??” त्याच्या या प्रश्नावर सोनालीने कपाळावर हात मारल्याचा इमोजी शेअर केला आहे. त्यासोबत ती म्हणाली, “दुःखद हे आहे… की, तुम्हाला हे कळत नाहीये की महाराष्ट्राला देशभर आणि जगभर पोहचविण्यासाठी, आपली कला, संस्कृति, खाद्य-संस्कृति, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमने हा जो उपक्रम राबवलाय तो तुम्हाला कौतुकास्पद, महाराष्ट्राच्या हिताचं नाही वाटत आहे”.
दुःखद हे आहे… की
तुम्हाला हे कळत नाहीये की महाराष्ट्राला देशभर आणि जगभर पोहचविण्यासाठी, आपली कला, संस्कृति, खाद्य-संस्कृति, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी @maha_tourism ने हा जो उपक्रम राबवलाय तो तुम्हाला कौतुकास्पद,
महाराष्ट्राच्या हिताचं नाही वाटत आहे— सोनाली (@meSonalee) February 7, 2023
सादर व्यक्ती इथेच शांत बसला नाही तो पुढे म्हणाला , “हो नक्कीच चांगला उपक्रम आहे पण हे सर्व त्यांना त्यांच्या भाषेतून समजणार. दक्षिणेत अस होत नाही ताई ते आपल्या भाषेवर ठाम असतात आणि आपल्या भाषेतून जगाला समजवण्याचा प्रयत्न करतात. यातून आपली कला, संस्कृती,पर्यटन सर्व इतर देशात राज्यात नक्की पोहोचेल पण आपल्या भाषेवर उलट परिणाम होईल. मत मांडली तर वाद अस वाटेल ताई प्रत्येकाची मत वेगळे असू शकतात माझी मी वेगळ्या चष्म्यातून बघतो तुम्ही वेगळ्या.. आपले मराठी चित्रपट आम्ही कुटुंबासहित बघतो आणि बघणार शेवटी तुमच्या कलेचे चाहते आहोत आम्ही.”
दुःखद हे आहे… की
तुम्हाला हे कळत नाहीये की महाराष्ट्राला देशभर आणि जगभर पोहचविण्यासाठी, आपली कला, संस्कृति, खाद्य-संस्कृति, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी @maha_tourism ने हा जो उपक्रम राबवलाय तो तुम्हाला कौतुकास्पद,
महाराष्ट्राच्या हिताचं नाही वाटत आहे— सोनाली (@meSonalee) February 7, 2023
त्याच्या ट्विटनंतर अजूनपर्यंत सोनालीने त्याला कोणतेही उत्तर दिलेले नाही. दरम्यान सोनाली करत असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि एका न्यूज चॅनलच्या विद्यमानाने होत आहे. याकार्यक्रमातून महाराष्ट्रात असणाऱ्या पर्यटनाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा उद्देश समोर ठेवला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अर्जुन कपूरने चक्क व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला म्हटलं, ‘झुटी और मक्कार’
रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ