या नव्या वर्षात बॉलिवूडचे सेलिब्रिटी हे कुठे ना कुठे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी फिरायला जातच आहेत. कुणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलं होतं तर कुणी आता जात आहेत. गेल्या काही दिवसांत आपण फिरायला गेलेल्या प्रत्येक अभिनेत्रीचे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोज जर पाहिले तर त्यांच्या फोटोंमध्ये बोल्डनेस हा ठासून भरलेला आहे. यात कियारा अडवाणी, अनन्या पांडे यांच्या बिकिनी फोटोजने तर इंटरनेटवर बोल्डनेसचा कहर केला होता, इतक्या त्या दोघीही आपापल्या फोटोंमध्ये सुंदर दिसत होत्या.
तर मंडळी, तयार व्हा पुन्हा एकदा हॉटनेस आणि बोल्डनेसचा झटका झेलण्यासाठी! अभिनेत्री सोनल चौहान ही सध्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली आहे. सोनलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत की आपण बघताक्षणी अवाक व्हाल…
सोनल चौहान हे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल. जन्नत सारख्या चित्रपटामधून या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु तत्पूर्वी दिल्ली मध्येच आपलं माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या सोनलने आपल्या करियरची दिशा मॉडेलिंगकडे वळवली. २००५ मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या नंतर एफएचएम या मॅगझीनच्या कव्हर पेजवरदेखील ती त्याच वर्षी झळकली. एफएचएम मॅगझीनमध्ये जगातील शंभर सर्वात सेक्सी महिलांची यादी त्यांच्या नावं, फोटो आणि कार्यासकट छापलं जातं. या महितीसोबतच आता वेळ झालीये सोनलचा एक हॉट आणि तितकाच सुंदर फोटो पाहण्याची…
सोनलला यानंतर बॉलिवूडमधून ऑफर्स येऊ लागल्या. २००८ मध्ये सोनलने पहिल्यांदा जन्नत या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत इम्रान हाश्मी हा मुख्य भूमिका साकारत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या सिनेमामुळे सोनलच्या नावाची बॉलिवूडमध्ये चर्चा होऊ लागली.
यानंतर तिने अनेक हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात चेलुवेये निन्ने नोडालू, बुड्ढा होगा तेरा बाप, लेजंड, साईझ झिरो, पलटण, रुलर या आणि अशा आणखीन चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. रुलर हा २०१९ मध्ये आलेला तेलगू चित्रपट तिचा अखेरचा चित्रपट आहे. एक अभिनेत्री, मॉडेल यासोबतच सोनल एक गायिका देखील आहे. या माहिती सोबतच आपण सोनलच्या आणखीन काही सुंदर फोटोंवर नजर टाकूयात.