Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! सोनालीच्या हत्येनंतर मुलगी यशोधराच्या जीवाला धोका? कुटुबीयांकडून सुरक्षेची मागणी

टिकटॉक स्टार आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट हिच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. तिच्या निधनानंतर समोर आले की, तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या हत्येचा तपास सुरू आहे. मात्र, यामुळे तिचे कुटुंबीय आणि मुलगी समाधानी नाहीयेत. अशात यशोधरा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात तिने तिच्या आईच्या हत्येचा तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, कुटुंबीयांनीदेखील यशोधरासाठी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. सोनालीच्या निधनानंतर तिची सर्व संपत्ती ही यशोधराची आहे. अशात कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, यशोधराच्या जीवाला धोका आहे.

यशोधराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र
सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास गोवा पोलीस करत आहेत. मात्र, तिचे कुटुंबीय आणि मुलगी यशोधरा (Yashodhara) या तपासाबद्दल खुश नाहीयेत. यशोधराने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून न्याय मागितला आहे. तिने पत्रात लिहिले की, “मी, सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधरा फोगट आहे. मी या प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्याचे आवाहन सरकारकडे करत आहे.”

याव्यतिरिक्त सोनालीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे वाटते. त्यांचे असे म्हणणे आहे की, गोवा पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे ते व्यवस्थित या प्रकरणाचा तपास करत नाहीयेत.

कुटुंबीयांनी यशोधराच्या सुरक्षेसाठी केली मागणी
सोनाली जवळपास 100 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे फार्म हाऊस आणि बरीच एकर जमीनही आहे. सोनालीच्या निधनानंतर यशोधरा ही या संपत्तीची एकमेव वारसदार आहे. अशात कुटुंबाने सरकारकडे यशोधराच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना यशोधराचे काका आणि सोनालीचे दीर कुलदीप यांनी म्हटले की, त्यांच्या पुतणीच्या जीवाला धोका असू शकतो. ते म्हणाले, “ज्यांनी सोनालीची हत्या केली, तेच यशोधरा हिची मालमत्ता हडप करू शकतात. आम्ही एसपींना भेटून यशोधराच्या सुरक्षेसाठी बंदुकीची मागणी करू. ज्या व्यक्तीने सोनालीच्या मृत्यूचा कट रचला तो यशोधराविरोधातही काहीही करू शकतो. त्याने मालमत्ता हडप करण्याचा कोणताही कट रचला नाही ना, अशी भीती आम्हाला वाटते.”

आता कुटुंबीयांच्या मागणीनंतर सोनालीच्या हत्येचा तपास सीबीआयकडे जातो का, आणि तिच्या मुलीला पोलीस सुरक्षा मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘गुडबाय’चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ, शूट करायला लागले तब्बल 25 तास
दर्शनासाठी तिरुपती बालाजी मंदिराने लाच मागितल्याचा आरोप, अभिनेत्री अर्चना गौतमचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा