Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड पधारो म्हारे देस! डोहाळे जेवणासाठी लंडनहून भारतात परतली सोनम, थाटात पार पडणार सोहळा

पधारो म्हारे देस! डोहाळे जेवणासाठी लंडनहून भारतात परतली सोनम, थाटात पार पडणार सोहळा

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहुजा यांनी २०१८मध्ये लग्नगाठ बांधली होती. यानंतर मार्च २०२२मध्ये सोनमने आपल्या गरोदरपणाची गोड बातमी सोशल मीडियावर दिली. सोनम आणि आनंद त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत. त्यानंतर, अनेकदा सोनमने बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी खास पसंती दिली आणि ते प्रचंड वायरल झाले.

अशात सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्या लंडनमधल्या घरातही नुकतेच डोहाळे जेवणाचे आयोजन केले होते. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या सोहळ्यात लंडनमधील त्यांचे काही मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य सामील झाले होते. यानंतर, आता मुंबईत तिचे वडील आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी, आपल्या लाडक्या लेकीसाठी डोहाळे जेवणाचे आयोजन केले आहे.

Sonam-Kapoor

या सोहळ्यात अभिनेत्री करीना कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, जॅकलिन फर्नांडिस, सोनमची जवळची मैत्रीण मसाबा गुप्ता, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज पाहुणे म्हणून येणार आहेत. पाहुण्यांना या सोहळ्याचे आमंत्रणही मिळाले आहे. यासाठी, सोनम गुरुवारी (दि. १४ जुलै) भारतात परतली.

Sonam-Kapoor

यावेळी तिने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच गोड दिसत होती. बेबी बंप सोबतही, ती आपल्या स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंटला जपत असल्यामुळे, सोनमचे तिच्या चाहत्यांनी विशेष कौतुक केले आहे. कोणी तिच्या कपड्यांची, तर कोणी तिच्या लुकची प्रशंसा करत आहे.

Sonam-Kapoor

आता सगळेच या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सध्या सोनम कपूर तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात असून तिच्या प्रसूतीची तारीखही जवळ आली आहे. सोनमने ‘रांझना’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘पॅडमॅन’, ‘संजू’, ‘भाग मिलखा भाग’, ‘वीरे दी वेडिंग’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कुणाला टांगलं उलटं, तर कुणाच्या अंगावर सोडले कुत्रे; ‘खतरों के खिलाडी १२’मधील स्पर्धकांवर ‘अत्याचार’

खतरनाक चेहरा अन् दमदार ऍक्शन! रिलीझ झाला ‘शमशेरा’चा टायटल ट्रॅक

‘बापासारखाच धमाकेदार स्टार बनेल’, धनुषच्या छोट्या मुलाचा ऍटिट्यूड पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

हे देखील वाचा