Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड खतरनाक चेहरा अन् दमदार ऍक्शन! रिलीझ झाला ‘शमशेरा’चा टायटल ट्रॅक

खतरनाक चेहरा अन् दमदार ऍक्शन! रिलीझ झाला ‘शमशेरा’चा टायटल ट्रॅक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) अभिनित ‘शमशेरा’ रिलीझ होणार आहे. या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे, ज्याची झलक चाहत्यांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा टायटल ट्रॅक देखील रिलीझ झाला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूरच्या धमाकेदार लूकने चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावले आहे. 

ऍक्शनने भरलेला ‘शमशेरा’ यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला आहे. अशा परिस्थितीत यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर चित्रपटाचा शीर्षक ट्रॅक रिलीझ करण्यात आला आहे, ज्यामध्ये रणबीर खूपच आकर्षक दिसत आहे. या गाण्याची सुरुवातच प्रेक्षकांना थक्क करायला पुरेशी आहे. रणबीर सिंगच्या चिखलात भिजलेल्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसतो, जो गाण्याकडे सर्वांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे. या गाण्यात अनेक हायटेक ऍक्शन सीन्स आहेत, जे गाण्याला परफेक्ट बनवत आहेत. (shamshera title track out)

चित्रपटाच्या या गाण्याबाबत रणबीर कपूर म्हणाला की, “मी जेव्हाही हे गाणे ऐकतो, तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. सुखविंदर आणि अभिषेकने या गाण्यात सर्वकाही दिले आहे. त्यांनी एक असे लोकप्रिय गाणे आणले आहे, जे शमशेराच्या भावनेला धरून आहे.” याशिवाय रणबीरने असेही सांगितले की, शमशेरा एक अतिशय शक्तिशाली योद्धा आहे, ज्याचे किस्से सांगितले जातात.

विशेष म्हणजे, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट २२ जुलैला रिलीझ होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूर व्यतिरिक्त संजय दत्त (Sanjay Dutt) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त एका भयानक खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याचा लूकही खूपच खतरनाक आहे. हा चित्रपट करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित करत आहे.
author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा