बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या वेगळेपणामुळे ओळखले जातात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच आपल्या फॅशन आणि स्टाईलसाठी चर्चेत असतात. बी-टाऊनच्या पार्ट्या असो किंवा मग एखादा कार्यक्रम तिथे अभिनेत्री आपल्या फॅशनने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. परंतु काही वेळा त्यांना त्यांच्या फॅशनमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असेच काहीसे आता अभिनेत्री सोनम कपूरबाबत घडले आहे. सोनम आपल्या विचित्र ड्रेसमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
सोनमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट हॉट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटोशूट हार्पर बझार इंडिया मॅगझिनसाठी केले आहे. सोनमचे हे फोटो काही चाहत्यांना आवडले असून ते तिची प्रशंसा करत आहेत, तर काहीजण तिच्यावर ताशेरे ओढताना दिसत आहेत. यासोबतच विचित्र कमेंट्सही करत आहेत.
सोनमने ४ लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामुळे ती ट्रोल होत आहे. या फोटोमध्ये सोनम सिल्क डजेस सॅटिन ड्रेस आणि ट्राउझर्स घातले आहेत. प्रेक्षकांना तिचे हे आउटफिट काही केल्या समजत नाहीये.
एका युजरने ‘ही कोणती डिझाइन आहे आँटी?,’ अशा आशयाची कमेंट केली आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘हे गरुडासारखी काय बनली आहे?’ याव्यतिरिक्त काहींनी तिला वल्गर म्हटले आहे, तर काहीजण तिच्या या फोटोवर हसणाऱ्या इमोजी पोस्ट करत खिल्ली उडवत आहेत.
सोनम कपूर मागील काही दिवसांमध्ये स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ललित वॉचमेकिंग प्रदर्शन (Salon International de la Haute Horlogerie) कार्यक्रमात एक ड्रेस घातला होता. तिच्या या ड्रेसवरही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. नेटकऱ्यांनी तिची या ड्रेसची तुलना अनिल कपूरच्या कपड्यांशी केली होती. यावेळी एका युजरने तिला ट्रोल करत विचारले होते की, ‘दीदी तू तुझ्या वडिलांची पँट घातली आहे का?’
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










