अनिल कपूरांच्या लेकीला 1 वर्षाआधीच बनायचं होतं आई, पण कोणत्या कारणामुळे बदलावा लागला निर्णय?

0
57
Sonam-Kapoor
Photo Courtesy: Instagram/sonamkapoor

अभिनेत्री सोनम कपूर ही 20 ऑगस्ट रोजी आई बनली. तिने एका मुलाला जन्म दिला, पण सोनमला 2020 मध्येच आई व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी देखील केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना त्यांचा प्लॅन पुढे ढकलावा लागला. याचा खुलासा सोनमने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.

मुलाखतीदरम्यान, सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने सांगितले की, “आम्ही 2020 मध्ये बाळाचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे आम्ही आमचे नियोजन पुढे ढकलले.” सोनम गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गरोदर होती. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोनमने सांगितले की, “2018 मध्ये लग्नानंतर मी आणि माझे पती आनंद आहुजा यांनी ठरवले होते की, आपण 2 वर्षे वाट बघू. नंतर बाळाचे नियोजन करू. मात्र, त्याआधी 2019 मध्ये कोरोना महामारी आली. या दरम्यान आमचे अनेक मित्र आणि ओळखीचे लोकही खूप वाईट परिस्थितीतून गेले. त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.”

सोनमने पुढे सांगितले की, “आमच्या कुटुंबात बाळंतपणाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. आमचे आई- बाबा, कुटुंब रुग्णालयात देखभालीसाठी येतात. गर्भधारणेदरम्यान खूप काळजी घेणे आवश्यक असते. दवाखान्यातही जावे लागते. अशा परिस्थितीत कोरोना महामारीमुळे गर्भधारणेचे नियोजन पुढे ढकलावे लागले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

“यानंतर आम्ही खूप वाट पाहिली. यासोबतच आम्ही भारत आणि लंडनमधील डॉक्टरांशी सतत संपर्क साधला. त्याचबरोबर चाचणी देखील करून घेतल्या. जेव्हा चाचणीचे निकाल बरोबर आले आणि डॉक्टरांनी देखील रुग्णालयातील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही त्यावर चर्चा केली,” असेही सोनम पुढे म्हणाली. गरोदरपणाविषयी सांगताना सोनम म्हणाली की, “गेल्या जून महिन्यात माझ्या वाढदिवशी मी आनंदला सांगितले की, आता खूप प्रतीक्षा झाली. आता बाळाचे नियोजन करूया. तेव्हापासून आम्ही दोघांनीही बाळासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात मी गरोदर राहिली.”

सोनम कपूरविषयी बोलायचं झालं, तर तिने ‘सांवरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नीरजा’, ‘संजू’, ‘रांझना’ आणि ‘आयशा’ यांसारखे दमदार चित्रपट बॉलिवूडला दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘बॉलिवूडला संपवायला सुशांतचं…’, रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’वर सुशांतच्या बहिणीची खळबळजनक प्रतिक्रिया
‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात दीपिका बनणार रणबीरची आई? सिनेमातील ‘या’ सीनमधून मिळाली हिंट
ट्रेलर नंतर गुडबाय चित्रपटातील पहिले गाणे या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here