Friday, March 29, 2024

‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात दीपिका बनणार रणबीरची आई? सिनेमातील ‘या’ सीनमधून मिळाली हिंट

‘ब्रह्मास्त्र पार्ट 1: शिवा’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. पहिल्या पार्टची कथा रणबीर कपूर याच्या ‘शिवा’ या व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे. शिवा हा एक तरुण मुलगा आहे, ज्याच्याकडे आग नियंत्रित करण्याची महाशक्ती आहे. शिवाकडे एक ‘अस्त्र’ आहे, एक ‘दृष्टी’ आहे, जी त्याला दाखवते की, जग धोक्यात आहे. हे कळल्यावर तो केवळ विश्वाचे रक्षण करण्यासाठीच नाही, तर त्याच्यात लपलेल्या शक्तींचा शोध घेण्यासाठी प्रवासाला निघतो. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग दुसऱ्या भागाच्या अधिकृत घोषणेने संपतो.

दुसऱ्या पार्टचे शीर्षक ‘ब्रह्मास्त्र भाग 2- देव’ (Brahmastra Part 2 : Dev) आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) देवची भूमिका साकारण्यासाठी शर्यतीत आहेत. निर्मात्यांनी ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आणि ऋतिक रोशनशी संपर्क साधला आहे. ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिव’ हा तीन चित्रपटांच्या मालिकेतील पहिला भाग आहे.

हा चित्रपट एका नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘द ऍस्ट्राव्हर्स’च्या सुरुवातीचे प्रतीक आहे. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिची निवड केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दीपिका रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारणार आहे, जी ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मधील एका दृश्यात अस्पष्टपणे दिसते.

दीपिका होणार शिवाची आई?
रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणची व्यक्तिरेखा शिवाची एकूण प्रगती आणि परिवर्तन घडवते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहते चित्रपटात दीपिकाची चर्चा करत होते. पुढच्या भागात असं झालं तर प्रेक्षक आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी असेल.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ट्रेलर नंतर गुडबाय चित्रपटातील पहिले गाणे या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’
कार्तिक आर्यनच्या करिअरची गाडी एकदम सुसाट! ‘या’ आगामी चित्रपटांची भलीमोठी यादी एकदा पहाच

हे देखील वाचा