Tuesday, May 21, 2024

साेनाली सहगल मालदीवमध्ये पतीसोबत साजरा करत आहे हनिमून, शेअर केले रोमँटिक फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल हिने अलीकडेच तिचा प्रियकर आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले हाेते. लग्नानंतर जवळपास 20 दिवस ही अभिनेत्री मालदीवमध्ये पतीसोबत हनीमून एन्जॉय करत आहे.

सोनाली सहगल (sonnalli seygall) हिने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, लव्हबर्ड्स क्रूझवर मजा करताना दिसत आहेत. यादरम्यान सोनाली गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या स्लिट गाऊनमध्ये दिसत असून हा लूक आणखी सुंदर करण्यासाठी तिने हेअर बन टाकला आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीचा पती आशिष हा पर्पल आणि व्हाईट कलरच्या शर्टमध्ये दिसत आहे. व्हायरल फाेटाेंमध्ये साेनाली तिचे मंगळसूत्र आणि एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. अशात सोशल मीडियावर चाहत्यांनी या फोटोंना खूप पसंती दिली आहे आणि तिचे खूप कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnalli A Sajnani (@sonnalliseygall)

सोनाली आणि आशिष गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोनालीने हे नाते गुपित ठेवले होते. कारण, सोनालीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते.

सोनाली सहगल ‘प्यार का पंचनामा 2’ द्वारे प्रसिद्धीझोतात आली. सोनालीला हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 12 वर्षे झाली आहेत. मात्र, तिला अद्याप यश मिळू शकले नाही. 2011मध्ये ‘तिने प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती ‘वेडिंग पुलाव’, ‘प्यार का पंचनामा 2′,’ जय मम्मी दी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. साेनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली लवकरच नूरानी चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नुपूर सेनन मुख्य भूमिकेत आहेत. (actress sonnalli seygall is celebrating honeymoon with husband in maldives shared romantic pictures)

अधिक वाचा-
षडयंत्र की निर्मात्यांची अव्वाच्या सव्वा मागणी; काय रोखतंय केरळा स्टोरीला ओटीटीवर येण्यापासून, लगेच वाचा
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा