Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Sridevi | आईच्या आठवणीत व्याकूळ झाल्या जान्हवी आणि खुशी, शेअर केल्या भावनिक पोस्ट

चार वर्षापुर्वी हिंदी चित्रपटाला जोरदार धक्का देत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. संपूर्ण देशभरातून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या जाण्याने कपूर घराण्यावर दुखाःचा डोंगर कोसळला होता. पती बोनी कपूरसह (Boney Kapoor) त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी यांच्या डोळ्यातील अश्रूने सगळ्यांनाच भावूक केले होते. गुरुवारी (२४ फेब्रुवारी) श्रीदेवी यांची पुण्यतिथी. याच निमित्ताने खुशी कपूरने आपल्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्रातील सर्वात अभिनेत्रींच्या यादीत सर्वप्रथम श्रीदेवी यांचे  नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने हिंदी चित्रपट क्षेत्रात अनेक दशके निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर त्या काळात प्रत्येकजण फिदा होता. म्हणूनच त्यांचे चित्रपट आणि गाणी आजही सिनेसृष्टीत लोकप्रिय ठरत आहेत. मात्र या प्रतिभावान अभिनेत्रीच्या चार वर्षापुर्वी झालेल्या आकस्मित मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

श्रीदेवी यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. कपूर कुटूंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करत होते. त्यांच्या निधनाने खुशी आणि जान्हवी यांची अवस्था कोणालाही बघवत नव्हती. आजही आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त खुशीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये खुशी कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून श्रीदेवी यांच्या मांडीवर बसलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या लहानपणाचा असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

खुशी प्रमाणेच अभिनेत्री जान्हवी कपूरनेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या आपल्या आईसाठी भावनिक पोस्ट शेअर करत ती कशा प्रकारे आईला मिस करत असल्याचे सांगितले आहे. यामध्ये जान्हवीने श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Photo Courtesy: Instagram/janhvikapoor

त्यासोबत तिने भावनिक नोट लिहीली की, “मी माझ्या आयुष्यात जितकी वर्ष तुझ्याशिवाय जगलेय त्यापेक्षा जास्त मी तुझ्यासोबत जगलेय. या गोष्टीने आता खूप त्रास होतो की तुझ्याशिवाय जगलेल्या वर्षात आता आणखी एका वर्षाची वाढ झाली आहे. मला आशा आहे की तुला आमचा अभिमान वाटत असेल आई. कारण याच आशेवर आम्ही आयुष्यात पुढे जातोय.” दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींच्या आपल्या आईच्या आठवणीत शेअर केलेल्या या पोस्टने प्रत्येकजण भावनिक होत आहे. दोघीही आपल्या आयुष्यात प्रगती करत असून अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आईप्रमाणेच चित्रपट क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा