लग्न असो, पार्टी असो किंवा कोणताही समारंभ असो तिथे नेहमीच आपल्या कपड्यांना खूप महत्त्व असते. आपण सगळ्यात वेगळे आणि सुंदर कसे दिसू याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. बॉलिवूड अभिनेत्रींचं याबाबतीत तर काही सांगायलाच नको. लहान लहान गोष्टींचीही त्या काळजी घेतात. मात्र, कधी कधी त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो. असंच काहीसं प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीबद्दल घडलंय. त्यामुळे सनी चांगलीच चिंतेत पडली आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया…
अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सनी आपल्या ड्रेसमुळे चांगलीच चिंतेत सापडल्याचे दिसते. सनीच्या ड्रेसची साईजच नाहीये. एकीकडून ड्रेस खूपच छोटा, तर दुसरीकडून ड्रेस खूपच मोठा आहे. अशामध्ये सनीच्या कॉस्च्युम डिझायनर आणि क्रूमधील इतर लोक तिच्या ड्रेस ठीक करण्यात तिला मदत करत आहेत.
सनी लिओनीच्या ड्रेसमध्ये लागतायत टाके
या व्हिडिओत सनी आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये उभी आहे. इथे तिच्यासोबत क्रूमधील दोन मुली आणि दोन मुले आहेत. त्यातील एक कॉस्च्युम डिझायनर आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती सनीला विचारतो की, “काय सुरू आहे? कॉस्च्युम डिझायनरची अडचण काय आहे?” यावर उत्तर देत सनी म्हणते की, “मला माहिती नाही. एकीकडून ड्रेस खूप मोठा आहे, तर दुसरीकडून खूप छोटा. याला टाके टाका, त्यावर पिन मारा. असंच होतं… भारतीय कपड्यांमध्ये टाके आणि पिन, टाके आणि पिन, टाके आणि पिन आणि पाहा आणखी चार लोक आहेत.”
यावर ती व्यक्ती हितेश नावाच्या मुलाला विचारते, “तुला काही बोलायचे आहे का?” यावर हितेश म्हणतो, “काही नाही. हे आमचे रोजचे आहे.”
सनीचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच त्यावर ६ लाख लोकांनी लाईक्सचा पाऊसही पाडला आहे.
आऊटफिटबद्दल सांगायचे झाले, तर सनी लिओनी एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊज आणि स्कर्टमध्ये उभी आहे. या ब्लाऊजवर सुंदर नक्षी असून ते हिऱ्यांनी जडवलेले आहे. तसेच, स्कर्टचे डिझाइन देखील खूप सुंदर आहे. सनीच्या केसात एक मोठा रोलरही आहे.
या सिनेमात झळकणार सनी
सनी लिओनी सध्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करताना दिसत आहे. काही काळापूर्वी तो ‘पनघट’ आणि ‘माची’ या गाण्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. सनी मल्याळम आणि तमिळ सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ‘रंगीला’, ‘वीरमदेवी’, ‘शेरो’ आणि ‘ओह माय घोस्ट’ या सिनेमांमध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हिंदी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर सनी ‘कोका कोला’, ‘हेलेन’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
सनीने २०१२ साली ‘जिस्म २’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
हेही वाचा-