×

अरे आओ ना फिर! धरम पाजींनी आपल्या अंदाजात ‘बसंती’ बनलेल्या किरण यांना शिकवले आंबे पाडायला; पाहा व्हिडिओ

टीव्हीवरील सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेला रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ होय. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार पाहुणे म्हणून येत असतात. यावेळी या शोमध्ये बॉलिवूडचे ‘ही मॅन’ म्हणजेच धर्मेंद्र प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यामुळे या शोचा आगामी एपिसोड खूपच मजेशीर आणि शानदार असणार आहे. आता इतके मोठे सुपरस्टार सेटवर उपस्थित असणार म्हणजे हंगामा काय कमी नसणार हेही खरंच. नुकताच ‘इंडियाज गॉट टॅलेंट‘ शोचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये धर्मेंद्र यांचे शोमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या येण्यामुळे सर्वजण खूप खुश आहेत. दुसरीकडे ८६ वर्षीय धर्मेंद्र या प्रोमोमध्ये डान्स आणि ऍक्शन करतानाही दिसत आहेत.

फक्त डान्स आणि ऍक्शनच नाही, तर धर्मेंद्र (Dharmendra) जेव्हा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोच्या सेटवर पोहोचले, तेव्हा परीक्षक असलेल्या बादशाहने त्यांना एक विनंती केली. बादशाहने केलेली विनंती धर्मेंद्र नाकारू शकले नाहीत. बादशाहची ती खास विनंती होती, ‘शोले’ (Sholay) सिनेमातील आयकॉनिक सीन रिक्रिएट करण्याची. या सीनमध्ये वीरू म्हणजेच धर्मेंद्र होते आणि बसंती बनल्या होत्या किरण खेर (Kirron Kher). शोले सिनेमातील तो सीन, ज्यामध्ये धर्मेंद्र बसंतीला आंबे तोडायला शिकवत असतात. हाच सीन किरण खेर आणि धर्मेंद्र यांनी एकत्र मिळून पुन्हा तयार केला.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

या प्रोमोला आतापर्यंत २१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २ हजारापेक्षा जास्त लाईक्सही मिळाले आहेत.

वयाच्या ८६ व्या वर्षीही फिट आहेत धर्मेंद्र
अभिनेते धर्मेंद्र यांचे वय ८६ वर्षे आहे. या वयातही त्यांचा फिटनेस तरुणाईला लाजवेल असाच आहे. आयुष्यभर काम करणारे धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाऊसमध्ये शांततेचे जीवन जगत आहेत. जिथे ते व्यायाम करताना, भाजी पिकवताना दिसतात. त्यांची स्टाईल चाहत्यांना फार आवडते. इतकंच नाही, तर धर्मेंद्र सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेले असतात.

बॉलीवूडमध्ये ६ दशके घालवल्यानंतर, धर्मेंद्र अजूनही सिनेमात दिसत आहेत. ते लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा-

Latest Post