पाश्चिमात्य देशांमध्ये साजऱ्या होणाऱ्या हॅलोविन पार्टीची नशा भारतातही झपाट्याने वाढत आहे. दिवाळीची पार्टी संपल्यानंतर आता सेलिब्रिटी हॅलोविन पार्टी आयोजित करत आहेत. काही दिवसांनपूर्वी बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये हॅलोवीन पार्टीची धूम सुरू झाली हाेती. या पार्टीत स्टार आणि स्टार किड्सही सहभागी होत आहेत. अशात अभिनेत्री सनी लिओन हिचा हॅलाेविन लूक साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.
अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय देशांसारख्या पाश्चात्य देशांमध्ये हॅलोविन हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुंबईतील लोकप्रिय सेलिब्रिटी आणि कार्यकर्ता ओरहान अवत्रामणीने हॅलोविन पार्टी दिली, ज्यामध्ये बॉलिवूडचे यंग सेलेब्स सहभागी झाले होते.
View this post on Instagram
अभिनेत्री सनी लिओन (sunny leone) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री नियमित तिचे फोटो साेशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा हॅलोवीन लूक शेअर केला आहे. फोटोंमध्ये ती लाल आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने तिचे डोळे हायलाइट करत कॅमेऱ्यासमोर क्युट पोझ दिल्यात. इन्स्टाग्रामवर तिच्या पोस्टसोबतच सनीने कॅप्शनमध्ये तिच्या चाहत्यांना हॅलोविन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तिने अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पती आणि इतरांसोबत दिसत आहे.
View this post on Instagram
सनी लिओनी नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. ती तिच्या आयुष्यातील वैयक्तिक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच सनी लिओनी विमानतळावर स्पॉट झाली. जिथे ती पॅपराझींसोबत हिंदीत बोलताना दिसली. जेव्हा पॅपराझींनी सनीला हिंदी भाषेचे ज्ञान दिले तेव्हा तिने सांगितले की, सनीला हिंदी आणि पंजाबी दोन्ही भाषा चांगल्याप्रकारे येतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परिणीती चोप्रा हिची साेशल मीडियावर हवा, बिकीनी लूकने चाहत्यांना घातली भुरळ
अर्रर्र! कृष्णा अभिषेकच्या बहिणीची अवस्था पाहून घाबरले लोक ओठ आणि कपाळातून रक्ताच्या थारोळ्या