सनी लिओनीच्या नवीन गाण्यावर भडकले नेटकरी, आगपाखड करत म्हणाले, ‘तुमच्या फालतू डान्समुळे…’


अभिनेत्री सनी लिओनीचे नवीन गाणे ‘मधुबन में राधिका नाचे’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आपले हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताच एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर युजर्स अभिनेत्री आणि या गाण्याच्या निर्मात्यांना ट्रोल करत आहेत. यासोबतच हे गाणे हटवण्याचीही मागणी केली जात आहे. प्रकरण एवढ्या टोकाला पोहोचले की, या प्रकारामुळे प्रेक्षक त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे बोलू लागले. अशा परिस्थितीत या गाण्यात काय आहे आणि अभिनेत्रीचे हे नवीन गाणे वादाच्या भोवऱ्यात का सापडले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गाण्याच्या शब्दांव संतापले युजर्स
सनीच्या (Sunny Leone) या गाण्याला युजर्स आक्षेपार्ह आणि अश्लील म्हणत आहेत. या गाण्यात सनी ज्या पद्धतीने राधा आणि राधिकाच्या नावाने डान्स करत आहे, ते आक्षेपार्ह असल्याचे ते म्हणत आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.

संतप्त युजर्स करत आहेत सतत कमेंट
सोशल मीडियावर सनीच्या गाण्यावर प्रेक्षकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. सोशल मीडियावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ”तुमच्या फालतू डान्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “हे खूप बेकार लोक आहेत, जे राधिकाच्या नावाने असा डान्स करत आहेत.” आणखी एका युजरने लिहिले की, “तुम्ही लोक थोडी तरी लाज बाळगा. हिंदू आहात आणि देव-देवतांच्या नावाने अशी फालतू गाणी बनवता.” एका युजरने कमेंट केली की, “कृपया या सगळ्यामध्ये राधा माँला सामील करू नका. ती देवी आहे. ही काय गोष्ट आहे, कृपया या शब्दांना बदला. अशा प्रकारे कोणत्याही देवी-देवतांच्या नावाची गाणी बनवू नका. मी तुम्हा लोकांना विनंती करतो की, अशा गाण्यात राधे माँचे नाव वापरू नका.”

Sunny Leone Song Madhuban Fans Angry
Photo Courtesy: Instagram/sunnyleone

गाणे आहे रिमिक्स
सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. हे गाणे मोहम्मद रफीच्या १९६० मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावर आधारित आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!