बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक असलेली सनी लिओनी होय. ती तीन मुलांची आई आहे. सनीच्या दोन्ही मुलांचा जन्म सरोगसीद्वारे झाला असून, तिची मुलगी निशाला सनीने दत्तक घेतले आहे. सनी तिच्या मुलांच्या खूप जवळ आहे आणि ती अनेकदा त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसते. नुकतीच सनी तिच्या तीन मुलांसोबत स्पॉट झाली होती. यानंतर ट्रोलर्सनी सनीला आपल्या मुलीचा हात न धरल्यामुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली. सनीने प्रसिद्धीसाठी एक मूल दत्तक घेतल्याचेही ते म्हणाले. यानंतर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
या आरोपांवर सनी लिओनी (Sunny Leone) म्हणाली की, “मला वाटते की, ज्याने हे लिहिले आहे तो माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग नाही. मला असे वाटत नाही की, एका फोटोने माझे पालकत्व समजावे आणि मला जज करावे. घरी बसून माझे परीक्षण करणे सोपे आहे. माझ्या आयुष्याकडे किमान पाच मिनिटे तरी पाहा.” सनी लिओनीने म्हटले की, हे बोलणे अत्यंत मूर्खपणाचे आहे. मुलांचे संगोपन कसे असते हे कोणत्याही पालकांना कळेल. केलेल्या कमेंट्ससाठी मी फक्त हेच म्हणेन की, “ग्रो अप.”
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी निशा कौरला मुलगी दत्तक घेतली आहे. त्याचवेळी सरोगसीच्या माध्यमातून सनीच्या दोन मुलांचा जन्म झाला. अभिनेत्री सतत तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.
अलीकडेच सनी लिओनीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मेकअप रूममध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या कपड्यांच्या फिटिंगबद्दल खूपच नाराज दिसत होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सनी लिओनी मेकअप रूममध्ये शूटसाठी तयार होत आहे आणि तिने चमकदार व्हाइट मिक्स सिल्व्हर कलरचा पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. परंतु ड्रेसच्या खराब फिटिंगमुळे सनीची हालत खराब झाली. त्यामुळे त्याचवेळी, टीममधील लोक तिच्या ड्रेसला पिनने फिट करताना तसेच सुई आणि धाग्याने शिवताना दिसत आहे.
सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सनी लवकरच ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले आहे. या सीरिजमध्ये सनी एका हुशार एजंटच्या भूमिकेत आहे, ज्याने तिची स्मरणशक्ती गमावली आहे. या वेबसिरीजचे ८ भाग असतील. ही सीरिज १० मार्च रोजी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा –